मतदारांना मतदानासाठी पेन वापरण्यास बंदी

निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता भंग झाल्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या

Election Commission , EC , lifetime ban , lifetime ban on convicts from contesting , Poll , Criminals, Crime, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Election Commission : सध्याच्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या कक्षेनुसार गुन्ह्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि दोन वर्षांची शिक्षा झालेल्या राजकारण्यांना कारगृहातून सुटल्यापासून ते पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी आहे. त्यामुळे सध्या निकोप आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीच्या पक्रियेतील अडथळे कायम आहेत.

शिक्षक मतदारसंघ निवडणूक; आचारसंहिता भंगाचा एकही गुन्हा नाही

विधान परिषद शिक्षक मतदारसंघाच्या ३ फे ब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम टाकण्यासाठी स्वत:चा पेन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी आयोगाकडूनच एक विशेष पेन दिला जाईल व त्याचाच मतदारांना वापर करावा लागेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी व विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिक्षक मतदारसंघात एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांना मतदान करताना उमेदवाराच्या नावापुढे पसंतीक्रम लिहावा लागतो. त्यासाठी मतदार नेहमी स्वत: जवळचा पेन वापरतात. मात्र तसे करणे चुकीचे आहे. आयोगाने दिलेल्या पेनच्या माध्यमातूनच ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे, असे अनुपकुमार म्हणाले.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता भंग झाल्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची चौकशी करण्यात आली. मात्र त्यात काहीही तत्थ्य आढळून आले नाही. त्यामुळे आतापर्यंत या निवडणुकीत एकही आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

३ तारखेला होणाऱ्या निवडणुकीची सर्व तयारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहे. एकूण ७०० कर्मचारी लागणार आहे. एकूण १२४ केंद्र राहणार आहे. नागपुरात ४३ केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर व्यवस्था करण्यात आली आहे. दोन टप्प्यात प्रशिक्षण वर्ग होतील. नागपुरात २१ आणि २८ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय आणि सेंट ऊर्सूला मुलींच्या शाळेत हे प्रशिक्षण दिले जाईल. निवडणूक निरीक्षक म्हणून एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.एम. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 मतमोजणी सेंट ऊर्सूला मुलींच्या शाळेत

मतमोजणी ६ फेब्रुवारीला नागपुरातील सिव्हील लाईन्स परिसरातील सेंट ऊर्सूला मुलींच्या शाळेत होणार असून त्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. ३ फेब्रुवारीला मतदान झाल्यावर पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्य़ातील मतपेटय़ा येथे जमा केल्या जातील. त्यानंतर सहा तारखेला मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. शाळेत पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे अनुपकुमार यांनी स्पष्ट केले.

शाई उजव्या हाताला

शिक्षक मतदारसंघासाठी मतदान करताना मतदारांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्यात येईल. नुकत्याच  पालिका निवडणुका झाल्या. या निवडणुकीत मतदान करणाऱ्यांच्या डाव्या हाताच्या पहिल्या बोटाला शाई लावण्यात आली होती. या मतदारांपैकी शिक्षक असणाऱ्यांना आता शिक्षक मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदान करावे लागणार आहे. त्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

ती तक्रार राजकीय

नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे मुळचे नागपूरचे असल्याने त्यांना या निवडणूक प्रक्रियेत सहभागी करण्यावर अ‍ॅड. उके यांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली होती. याबाबत अनुपकुमार यांना विचारले असता त्यांनी ही राजकीय स्वरूपाची तक्रार असल्याचे स्पष्ट केले. कुर्वे हे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत. या विधान परिषद निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ते काम पाहात नाही. निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना सर्व बाबींची शहानिशा करतो, असे अनुपकुमार म्हणाले.

 

मतदान केंद्राची संख्या

जिल्हा केंद्र

नागपूर ४३

भंडारा  १२

चंद्रपूर  २७

वर्धा   १४

गोंदिया १०

गडचिरोली     १८

एकूण  १२४

 

एकूण मतदार  ३४,९८७

एकूण उमेदवार       १६

एकूण कर्मचारी       ७००

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pen ban for voters during voting