बुलढाणा : तालुक्यातील देऊळघाट बस थांबाजवळच्या मुख्य मार्गावरील ‘फोटोफास्ट स्टुडीओ’ला लागलेल्या आगीत सुमारे ६ लाखांचे साहित्य व उपकरणे खाक झाली. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धिरज अनिल काटेकर (रा.दहिद) यांचा देऊळघाटमध्ये फोटो स्टुडीओ आहे. बुधवारी शाॅर्टसर्किटमुळे दुकानाला आग गली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाहतापहाता दुकानातील अडीच लाखांचा कॅमेरा, दीड लाखांचा शुटींग कॅमेरा, १ लाख ३५ हजार रुपयांचा ड्रोन कॅमेरा व इतर साहित्य, असे सहा लाखांच्यावर साहित्य जळून खाक झाले आहे़. तलाठी कोळसे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

वर्धा : छम छमाछम पार्टी! टार्गेट पूर्ण करणारे कृषी व्यवसायी झाले स्वतःच टार्गेट

नाशिक : देवळा तालुक्यात हातभट्ट्या उदध्वस्त

वाशिम: ‘स्ट्रीट लाईट’च्या प्रकाशाने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात; शेतकरी अनोख्या संकटात

टिटवाळ्यातील श्री महागणपती हॉस्पिटल विस्ताराच्या वाटेवर!