scorecardresearch

Premium

नागपूर विमानतळावर वैमानिकाचा मृत्यू

कॅप्टन मनोज सुब्रम्हण्यम रा. कांचीपुरम (तामिळनाडू) असे मृत्यू झालेल्या वैमानिकाचे नाव आहे.

pilot dies nagpur airport
नागपूर विमानतळावर वैमानिकाचा मृत्यू (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: इंडिगोच्या नागपूर- पुणे विमानाचे सारथ्य करण्यासाठी विमानतळावर निघालेल्या वैमानिकाचा हृदय विकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी नागपूर विमानतळावर घडली. कॅप्टन मनोज सुब्रम्हण्यम रा. कांचीपुरम (तामिळनाडू) असे मृत्यू झालेल्या वैमानिकाचे नाव आहे.

इंडिगो विमान कंपनीने यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनानुसार इंडिगोचे विमान नागपूरहून पुण्यासाठी दुपारी एक वाजता उड्डाण घेणार होते. त्यासाठी कॅप्टन मनोज सुब्रमण्यम निघाले असता बोर्डिंग गेटजवळ अचानक कोसळले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले तेथे त्यांचा दु. २.२० मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जाते. मात्र शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Chandrakat Patil on runway
चंद्रकांतदादांचे लक्ष आता आंतरराष्ट्रीय धावपट्टीकडे! आढावा बैठक घेत दिल्या सूचना
youth murder in Dadar East
मुंबई : दादर पूर्व येथे २७ वर्षीय तरुणाची हत्या
speeding car hit two wheeler nagpur
नागपूर : भरधाव कारची दुचाकीला धडक, युवक उड्डाण पुलावरून खाली पडला
Ananda Germany a member of the German gang under Mokka was poisoned in police custody in Ichalkaranji
मोक्का अंतर्गत जर्मन टोळीतील आनंदा जर्मनीसह दोघांचे पोलीस कोठडीत विषप्राशन; घटनेने इचलकरंजीत खळबळ

हेही वाचा… सोने खरेदीची सुवर्णसंधी… दरात घसरण, नागपुरात आजचे दर पहा

\कॅप्टन मनोज यांनी त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर विमानाचे उड्डाण केले होते. त्यानंतर २७तासाची विश्रांती घेतल्यावर ते गुरुवारी दुपारी नागपूर-पुणे विमानाचे उड्डाण करणार होते. मात्र त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. या संदर्भात सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pilot dies at nagpur airport cwb 76 dvr

First published on: 17-08-2023 at 19:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×