चंद्रपूर : महाऔष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा वापर व उचल वाढवण्याकरिता वीजनिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी व सिमेंट कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांची उच्चस्तरीय बैठक ३ डिसेंबरला वीज केंद्राच्या हिराई विश्रामगृहात पार पडली. यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात राखेचा वापर करण्याकरिता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राकडून राख पुरवण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये ठरवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत वेकोलिच्या बंद पडलेल्या खाणींचे खड्डे राखेचा वापर करून भरण्याकरिता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राकडून राखेचा पुरवठा करण्यात येईल असे ठरले. प्रायोगिक तत्त्वावर हा अभिनव प्रयोग सुरू झाला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राजवळच्या परिसरातील सर्व सिमेंट कंपन्या एसीसी, अंबुजा, अल्ट्राटेक व दालमियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राखेची उचल वाढवण्याकरिता साधक-बाधक चर्चा झाली. त्याकरिता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे योग्य ती मदत करण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीमध्ये महानिर्मिती कंपनीचे मुख्यालयातील संचालक-संचलन व प्रकल्प अधिकारी संजय मारुडकर, संचालक वित्त बाळासाहेब थिटे, कार्यकारी संचालक पर्यावरण व सुरक्षितता डॉ. नितीन वाघ तसेच कार्यकारी संचालक तथा चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंत्ता पंकज सपाटे प्रामुख्याने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plant fly ash will be usedfor construction of national highway rsj 74 zws
First published on: 10-12-2022 at 09:40 IST