अमरावती: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांच्या हस्ते काल दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ‘ऑलीय दर्जली दोस्तलिक’ (सर्वोच्च मैत्रीचा सन्मान) प्रदान करण्यात आला. परदेशी नेत्यांना दिला जाणारा उझबेकिस्तानचा हा सर्वोच्च सन्मान आहे. त्याबद्दल भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी आनंद व्यक्त केला आहे. जगात असा एकही देश उरला नाही, ज्याने पंतप्रधानांना पुरस्कार प्रदान केला नसेल, तर विरोधकांनी आश्चर्य वाटून घेऊ नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभक्त, इमानदार

नवनीत राणा म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी खूप काही करत आहेत आणि त्यांनी जागतिक समुदायासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जगात असा एकही देश उरला नाही, ज्याला पंतप्रधान मोदींनी स्वीकारले नाही, तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. पंतप्रधान मोदींची प्रशंसा करताना नवनीत राणा म्हणाल्या की, पंतप्रधानांना सातत्याने मिळणारे आंतरराष्ट्रीय सन्मान हे त्यांचे कार्य आणि जागतिक योगदान दर्शवतात. नरेंद्र मोदींना त्यांचा ३६ वा सन्मान मिळाला किंवा जगात त्यांना सन्मानित करण्यासाठी एकही देश उरला नाही, तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

जगात भारताची प्रतिष्ठा वाढली

नवनीत राणा म्हणाल्या, पंतप्रधान मोदींच्या देशासाठीच्या कार्यामुळे भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढली आहे. त्यांच्या मते, पंतप्रधानांचे जागतिक समुदायासाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच त्यांना विविध देशांकडून सन्मानित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रामाणिकपणा आणि देशभक्तीचे मोठे उदाहरण आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान म्हणून जर कोणी खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणा आणि देशभक्तीचे प्रतिनिधित्व करत असेल, तर ते नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक ओळख अधिक मजबूत झाली आहे, असे त्या म्हणाल्या.

भाजप सुसंस्कृत पक्ष

नवनीत राणा म्हणाल्या, भाजप हा एक सुसंस्कृत पक्ष आहे. भाजपच्या बैठका या विरोधकांना टोमणा मारण्यासाठी कधीही घेतल्या जात नाहीत. मात्र. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टोमणा मारण्यासाठीच मंचावर येतात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे युवकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चुकीचा प्रचार करीत आहेत. २०२४ मध्ये देखील त्यांनी संविधानाचे नाव घेऊन अशाच प्रकारचा अपप्रचार केला होता