वर्धा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. तैलिक महासभेने आज त्यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला.

हेही वाचा >>> अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार या निव्वळ वावड्या – बाळासाहेब थोरात

हेही वाचा >>> यवतमाळ : घाटंजीत अस्वलाचा धुमाकूळ; वन विभागाने केले जेरबंद

एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पटोले यांनी ‘नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत,’ असे वक्तव्य केले होते. यामुळे ओबीसी व तेली समाजाच्या भावना दुखावल्याचा सूर उमटला. त्याचा निषेध म्हणून खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वातील तैलिक महासभेने  जिल्हाधिकारी कर्डीले यांना निवेदन दिले होते. पटोले यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यातून करण्यात आली होती. पण पटोलेंकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आज संघटनेच्या युवा शाखेने त्यांच्या पुतळ्याचे दहन करीत संताप व्यक्त केला. यावेळी पटोले यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. पटोले जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत निषेध करत राहणार, अशी भूमिका संघटनेचे विपीन पिसे यांनी मांडली आहे.