नागपूर : काही महाठग महावितरणच्या ग्राहकांना भ्रमणध्वनीवर  वीज खंडित करण्याचा संदेश पाठवून लुबाडत असल्याचा प्रकार लोकसत्ताने उघडकीस आणला होता. त्याची गंभीर दखल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतली असून महावितरणला अशा महाठगांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत त्यांनी एक ट्विटही केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंहगड रोड, पुणे येथील अॅड. संदीप सावंत या ग्राहकाला रात्री भ्रमणध्वनीवर एक संदेश आला. देयक न भरल्यास रात्रीच वीज खंडित करण्याची भीती दाखवली गेली. त्यांनी  महावितरण कंत्राटी वीज कामगार संघटनेचे नीलेश खरात यांच्याशी संपर्क साधल्यावर हे गौडबंगाल उघड झाले. अॅड. सावंत सजग असल्याने त्यांची फसवणूक झाली नाही. परंतु इतर अनेक ग्राहकांची अशाप्रकारे फसवणूक झाली असण्याची शक्यता कंत्राटी वीज कामगार संघटनेने व्यक्त केली व लगेच वरिष्ठांना सूचना केली. दरम्यान, लोकसत्ताने याबाबत गुरुवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दखल घेत अशी फसवणूक करणाऱ्यावर फौजदारी कारवाईचे आदेश दिले. नागरिकांनी अशा संदेशांना प्रतिसाद न देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police crackdown power consumers ysh
First published on: 21-01-2022 at 00:04 IST