scorecardresearch

पोलीस हवालदाराला लाच घेताना अटक

जीवनलाल रंगनाथ मिश्रा (५४), असे आरोपीचे नाव असून तो राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

पोलीस हवालदाराला लाच घेताना अटक
रजा मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी

प्रतिबंधक कार्यवाही टाळण्याकरिता लाच मागितली

राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीवर प्रतिबंधक कारवाई न करण्याकरिता ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रविवारी शिताफीने रंगेहात पकडले.

जीवनलाल रंगनाथ मिश्रा (५४), असे आरोपीचे नाव असून तो राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारकर्त्यांवर राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात ४०६, ४६८, ४१८ भादंवि गुन्हा दाखल होता. त्यावरून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ११० अन्वये प्रतिबंधक कार्यवाही न करण्याकरिता जीवनलाल मिश्रा यांनी तक्रारकर्त्यांला गाठून त्याला ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारकर्त्यांने लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दिली. या विभागाने तक्रारदात्यासोबत सापळा रचून रविवारी जीवनलाल मिश्रा यांना ५ हजार रुपये देण्याचे निश्चित केले. तक्रारकर्त्यांने मिश्रा यांना लाच देताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणात पोलीस हवालदारावर राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भावना धुमाळे, आसाराम शेटे, चंद्रशेखर ढोक, चंद्रनाग ताकसांडे, प्रवीण पडोळे, मंजुषा बुंधाळे, संतोष मिश्रा यांनी केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-09-2016 at 04:31 IST

संबंधित बातम्या