Premium

नागपूर: पोलीस निरीक्षक राजपूत यांच्याकडून तपास काढला; लैंगिक अत्याचार, छळ प्रकरण

घरकाम करण्यासाठी विकत आणलेल्या बारा वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगाला दोघांनी सिगारेटचे चटके देऊन लैंगिक अत्याचार बहुचर्चित गुन्ह्याचा तपास ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून काढण्यात आला.

rajput
नागपूर: पोलीस निरीक्षक राजपूत यांच्याकडून तपास काढला; लैंगिक अत्याचार, छळ प्रकरण( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

नागपूर : घरकाम करण्यासाठी विकत आणलेल्या बारा वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगाला दोघांनी सिगारेटचे चटके देऊन लैंगिक अत्याचार बहुचर्चित गुन्ह्याचा तपास ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून काढण्यात आला. आता हा तपास गुन्हे शाखेच्या (एएचटीयू) प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी तहा अरमान खान, पत्नी हिना खान आणि मेहुणा अझहर शेख या तिघांनी बेंगळुरुमधील एका चौकीदाराच्या कुटुंबाकडून घरकाम करण्यासाठी १२ वर्षीय चिमुकलीला विकत घेतले होते. त्या चिमुकलीकडून घरातील सर्व कामे करून घेतल्या जात होते. तसेच त्या मुलीच्या शारीरिक वाढीसाठी हार्मोन्सचे इंजेक्शन देण्यात येत होते. मुलीवर अरमान आणि अझहर या दोघांची वाईट नजर होती. त्यामुळे दोघांनी तिच्याशी अश्लील चाळे करणे सुरु केले. याबाबत तिने हिनाकडे तक्रार केली असता तिने मुलीला गरम तव्याने चटके देऊन पुन्हा तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हापासून पती आणि भाऊ दारु पिऊन मुलीच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके देऊन तिच्यावर बलात्कार करीत होते. अरमान, हिना आणि अझहर बेंगळुरूला निघून गेले. त्यांनी मुलीला घरात बाथरूममध्ये कोंडून ठेवले. हा प्रकार उघडकीस येताच हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस उपायुक्त आणि ठाणेदाराने पोक्सो कायद्यानुसार महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे तपास देणे अनिवार्य होते. मात्र, तपास पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड यांच्याकडे दिला.

हेही वाचा >>>राज्यात गेल्या नऊ महिन्यात वाघाचे आठ बछडे मृत्युमुखी; वाघांची संख्या वाढली, पण मृत्युचे प्रमाणही वाढले

राठोड यांनी दोन्ही आरोपींना पोलीस ठाण्यात व्हिआयपी वागणूक देत चहा, नाश्ता, थंड पाणी आणि बोलायला मोबाईल दिला. पोलीस आयुक्तांच्या प्रकार लक्षात आल्याने पीएसआय राठोड यांनी निलंबीत करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा पोक्सो कायद्याला तिलांजली देत महिला पोलीस अधिकाऱ्यांऐवजी ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांना तपास सोपवला होता. त्यामुळे नागरिकांनी पोलीस आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त करीत आ. चंद्रशेखर बावणकुळे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यानंतर मंगळवारी ठाणेदार राजपूत यांच्याकडून तपास काढण्यात आला. तो तपास आता गुन्हे शाखेच्या एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे सोपविण्यात आला.

हेही वाचा >>>पायाभूत सुविधा निर्माण कार्याचा रेल्वे गाड्यांना फटका; ‘या’ रेल्वे गाड्या रद्द व ‘यांच्या’ मार्गात बदल

राज्य महिला आयोगाने घेतली दखल

हुडकेश्वरमधील १२ वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके आणि बलात्कार प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली. आयोगाच्या सदस्या आभाताई पांडे तपासाचा आढावा घेणार आहेत. तसेच निष्पक्ष तपास व्हावा यासाठी सूचना देणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police inspector jagvendrasinh rajput conducted an investigation in the case of sexual assault and harassment adk 83 amy

First published on: 12-09-2023 at 16:47 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा