गोंदियात जमावाकडून पोलिसांवर हल्ला; पोलीस अधिकारी जखमी

दोन मजुरांच्या मृत्यूनंतर जमावाचा पोलिसांवर हल्ला

गोंदियात जमावाकडून पोलिसांवर हल्ला; पोलीस अधिकारी जखमी
दोन मजुरांच्या मृत्यूनंतर जमावाचा पोलिसांवर हल्ला

गोंदियात दोन मजुरांच्या अपघाती मृत्यूनंतर संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. यात पोलीस अधिकारी व काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. दोन मजुरांच्या मृत्यूनंतर आंदोलन सुरु असताना पोलीस पांगवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

वाळू तस्करी करणाऱ्या टिप्परने बुधवारी (ता.१५) सकाळी नऊच्या सुमारास महालगाव-मुरदाडाजवळ ट्रॅक्टरला धडक दिली होती. या अपघातात महालगाव प्रशांत धर्मराज आगाशे (वय २४) याचा जागीच मृत्यू, तर गुलशन बळीराम कावळे (वय १९) या गंभीर जखमीचा रात्री मृत्यू झाला. या घटनेनंतर महालगावासी संतप्त झाले.

जमावाने प्रशांत आगाशे याचा मृतदेह रात्री दवनीवाडा पोलीस ठाण्यात नेला. शिवाय गुरुवारी (ता. १६) सकाळी ११ वाजेपासून मृत गुलशन कावळे याचा मृतदेह घेऊन महालगाव येथे चक्काजाम केले. जमावाने महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी दुपारी पोलिसांनी लाठीमार केला. यामुळे जमाव आणखी उग्र झाला व जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. यात पोलीस अधिकारी व काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ न्यूज ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police officials attacked in gondia during protest sgy

Next Story
नागपूर : पोलीस-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की ;युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जखमी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी