scorecardresearch

गडचिरोली: नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटलाची हत्या, ४० ते ५० नक्षलवाद्यांनी केलेलं अपहरण; गोळ्या घालून मृतदेह रस्त्यावर फेकला

काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास ४० ते ५० नक्षलवादी आले आणि पोलीस पाटलांना घेऊन गेले

-रवींद्र जुनारकर

एटापल्ली तालुक्यातील डोद्दूर गावचे पोलीस पाटील कुल्ले वंजा कोवासी याची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची घटना आज मंगळवारी (२४ मे २०२२ रोजी) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी भामरागड व एटापल्ली या दोन तालुक्यात धुमाकूळ घातला असून काही दिवसांपूर्वीच रस्त्यांच्या कामावरील वाहने जाळून दहशत निर्माण केली होती.

काल सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नक्षलवादी मौजा डोद्दुर येथील गाव पाटील कुल्ले वंजा कोवासी हे डोद्दूर पत्ता फडीवर असतांना ४० ते ५० नक्षलवादी तिथे आले. नक्षलवादी जबरदस्तीने पोलीस पाटलांना घेऊन गेले. त्यानंतर कोवासी यांना बेदम मारहाण करण्यात आली. डोद्दूर ते वटेली कच्च्या रस्त्यावर नेऊन कुल्ले कोवासी यांची गोळी झाळून हत्या केली. त्यानंतर कोवासी यांचा मृतदेह रस्त्यावर आणून ठेवला.

पोलीस खबरी असल्याचा संशय असल्यामुळेच हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सदर माहिती त्यांचा मुलगा किशोर कुल्ले कोवासी व पंधरा ते वीस सहकाऱ्यांनी पोलीस मदत केंद्रात येवून दिली. या घटनेमुळे पून्हा एकदा परिसरात दहशत व भितीचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police patil killed by naxalite in gadchiroli district etapalli village scsg

ताज्या बातम्या