Police raided two big hotels in Ramdaspeth and Sonegaon areas of Nagpur on a sex racket | Loksatta

मॉडेलिंग सोडून देहव्यापाराकडे वळली अन्…; खबऱ्याच्या एका ‘टीप’ने बिघडवला खेळ

देश-विदेशातील वारंगणा येऊन नागपूर शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये देहव्यापार करतात. महिन्याकाठी देहव्यापारातून लाखो रुपयांची उलढाल होत असते.

मॉडेलिंग सोडून देहव्यापाराकडे वळली अन्…; खबऱ्याच्या एका ‘टीप’ने बिघडवला खेळ
प्रातिनिधिक छायाचित्र

नागपुरातील रामदासपेठ आणि सोनेगाव परिसरातील दोन मोठया हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात उत्तरप्रदेशातील तीन तरुणींची देहव्यापाराच्या दलदलीतून सुटका केली तर दोन दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तीनपैकी एक तरुणी उत्तरप्रदेशमध्ये काही भोजपुरीमधील जाहिरातीमध्ये मॉडेल म्हणून काम करीत होती. झटपट पैसा कमविण्यासाठी ती देहव्यापाराकडे वळली आणि अडकली.

हेही वाचा- …आणखी एक बळी जाण्याच्या मार्गावर; आठवडाभरपूर्वीच “त्या” जोडप्याचाही झाला होता मृत्यू

नागपुरात देश-विदेशातील वारंगणा येऊन शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये देहव्यापार करतात. नागपूरसह अन्य जिल्ह्यातील आंबटशौकीन ग्राहकांना हेरून महिन्याकाठी देहव्यापारातून लाखो रुपयांची उलढाल होत असते. रामदासपेठमधील सेंट्रल बाजार मार्गावरील ऑक्टेव्ह पार्कलॅंड सूट्स नावाच्या हॉटेलमध्ये समीर आणि जोसेफ कुटी (३२,जरीपटका) या दोन दलालाने देहव्यापार सुरू केला होता. त्याने यापूर्वी दिल्ली आणि काश्मीरमधील तरुणींना देहव्यापार करण्यासाठी येथे करारपद्धतीवर आणले होते. नुकताच त्याने उत्तरप्रदेशातील दोन तरुणींना या हॉटेलमध्ये ठेवले होते. आंबटशौकीनांची गर्दी वाढल्याने एका कर्मचाऱ्याने सीताबर्डी पोलिसांनी टीप दिली. त्यावरून सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी ऑक्टेव्ह पार्कलॅंड सूट्स येथे छापा घातला. दोन तरुणींना ग्राहकांसह पकडले. त्यांचा दलाल जोसेफ कुटीला अटक केली. त्याने एक तरुणी सोनेगाव रोडवरील हॉटेल फ्लोरा ईन या हॉटेलमध्ये देहव्यापार करीत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी याच सेक्स रॅकेटची सदस्य असलेल्या त्या तरुणीने बूक केलेल्या रुमवर छापा घातला असता तिलासुद्धा ग्राहकासह ताब्यात घेण्यात आले. तीनही मुलींना शासकीय महिला सुधारगृहात ठेवण्यात आले. दोन्ही दलालांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा- अमरावती: सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू; इच्छुकांकडून मतदारांच्या गाठीभेटी

लाखांच्या घरात करार

तीनपैकी एक तरुणी उत्तरप्रदेशमध्ये काही भोजपुरीमधील जाहिरातीमध्ये मॉडेल म्हणून काम करीत होती. झटपट पैसा कमविण्यासाठी ती देहव्यापाराकडे वळली. नागपुरात वारांगणाशी होणारा करार लाखात असल्यामुळे ती येथे आली होती. सेक्स रॅकेटचा सूत्रधार समीर याचा पोलीस शोध घेत असून त्याच्या संपर्कात काही विदेश तरुणी असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 17:20 IST
Next Story
गडकरी म्हणतात सध्या ऊसा सारखी फायद्याची शेती दुसरी नाही…