नागपूर : शहरात सुरु असलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त ‘स्पा-मसाज सेंटर’मध्ये ‘सेक्स रॅकेटॅ सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या छापा कारवाईतून उघडकीस आली आहे. गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेने घातलेल्या २६ छाप्यात तब्बल १४ ‘स्पा-मसाज सेंटर’मध्ये देहव्यापार करताना तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. तर नागपुरातील सर्वाधिक नामांकित असलेल्या गंगा स्पामध्ये पोलिसांनी छापा घालून ४ तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक ब्युटी पार्लर, पंचकर्म, युनिसेक्स सलून आणि ‘स्पा-मसाज सेंटरच्या आड बिनधास्त देहव्यापार सुरु असतो. देहव्यापाराचे लोण हे महिला जीमपर्यंत पोहचला आहे. ‘स्पा-मसाज सेंटर’मध्ये सर्वाधिक देहव्यापार होत असल्याचे पोलिसांच्या छापा कारवाईवरुन समोर आले आहे. सोमलवाडा चौकातील गंगा स्पा सेंटरमध्ये देहव्यवसायाचा कारभार सुरू होता. सेंटरचे मालक दाम्पत्य हा अवैध व्यवसाय चालवत होते.

हेही वाचा…“एक लाख द्या अन् पाच लाख घ्या,” इन्स्टाग्रामवरील दाव्याने खळबळ

व्यवसायाची कुणकुण लागताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने येथे छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी चार तरुणींची सुटका केली तर अवैध व्यवसाय चालविणारा स्पा सेंटरचा मालक नवीन भगवान सिंग (३७, रा. अमरनगर, सोनेगाव) याला अटक केली आहे. तर त्याची पत्नी विद्या उर्फ श्रृती नवीन सिंग ही देखील प्रकरणात आरोपी आहे.

सोनेगाव पोलीस ठाणे हद्दीतील सोमलवाडा चौकात गंगा स्पा सेंटर आहे. येथे स्पा सेंटरच्या आड अवैधरित्या देहव्यवसाय सुरू होता. नवीन सिंग आणि त्याची पत्नी श्रृती सिंग या दोघांनीही काही तरुणींना झटपट पैसा कमविण्याचे आमिष दाखवून देहव्यवसायाच्या दलदलीत ढककले. दोघेही या मुलींकडून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी देहव्यवसाय करून घेत होते. तर देहव्यवसायाकरिता तरुणींना आंबटशौकीन ग्राहक आणि जागा उपलब्ध करून देत होते. सिंग दाम्पत्याच्या या व्यवसायाची कुणकुण गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांना लागली होती.

हेही वाचा…बहिरम यात्रेत ‘बैलगाडा शर्यती’सोबतच राजकीय चढाओढ…

त्यानुसार पोलिसांनी शनिवारी एक बनावट ग्राहक ‘स्पा-मसाज सेंटर’ला पाठविला. येथे या ग्राहकाने त्यांच्याकडे तरुणीबाबतची मागणी केली असता आरोपींनी त्याला एका तरुणीसोबत पाठविले. या ग्राहकाने लगेच पोलिसांना इशारा करताच गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली आणि मालक नवीन सिंग याला ताब्यात घेतले. करवाईत पोलिसांनी ४ पीडित तरुणींची सुटका केली.

पोलिसांनी आरोपींचे ताब्यातून १ मोबाईल, ४ हजार ५०० रुपयांची रोकड, डीव्हीआर तसेच ईतर साहित्य असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर कलम १४३, ३(५) भान्यासं सहकलम ४, ५, ७ पिटा अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करत नवीन सिंगला अटक केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police raids revealed more than half of spa massage centers in city are running sex rackets adk 83 sud 02