लोकसत्ता वार्ताहर

यवतमाळ: अल्पवयीन मामेबहिणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या‎ आतेभावावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही घटना यवतमाळ तालुक्यातील एका गावात घडली असून पोलिसांनी २२ वर्षीय आतेभावाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

१७ वर्षीय‎ अल्पवयीन मुलगी शाळेला सुट्या असल्याने १२ मार्चला यवतमाळ तालुक्यातील एका गावात आपल्या आत्याकडे आली होती. त्यानंतर तिचे आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, आतेभावाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. दरम्यान, काही दिवसानंतर प्रकृती खराब झाल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा… “चित्रपट पहा आणि पैसे कमवा”चा मोह नडला; तुम्हीही करता का ही चूक?

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ती दीड महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांनीच थेट ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत अल्पवयीन मुलीच्या‎ आईसोबत संपर्क साधला. ही बाब ऐकताच अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी मुलीच्या‎ आईने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे‎ नोंद करण्यात आले आहे. पोलिसांनी रविवारी आतेभावाला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कौराशे, ज्ञानेश्वर मातकर करीत आहेत.