scorecardresearch

पोलीस उपनिरीक्षकांना अखेर पदोन्नती

राज्यभरातील ८५० पोलीस उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

१० मार्च रोजी प्रकाशित झालेले वृत्त

अनिल कांबळे

नागपूर : राज्यभरातील ८५० पोलीस उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या १३ महिन्यांपासून पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती रखडली होती. ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयात वेगवान हालचाली झाल्या आणि मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली. यामुळे पदोन्नतीची प्रतीक्षा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पोलीस दलातील ११० आणि १११ तुकडीतील ८५० पोलीस उपनिरीक्षक १३ महिन्यांपूर्वीच पदोन्नतीस पात्र ठरले होते. परंतु, करोना आणि इतर कारणामुळे पदोन्नत्या रखडल्या होत्या. ११ फेब्रुवारी रोजी पोलीस महासंचालक कार्यालयातून ८५० पोलीस उपनिरीक्षकांना महसुली संवर्ग मागण्यात आला. मात्र, महिना लोटल्यानंतरही पदोन्नतीबाबत हालचाली होत नव्हत्या. ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. अखेर महासंचालक कार्यालयाने संवर्ग मागितलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समस्यांचे समाधान झाल्यानंतर पदोन्नतीची यादी जाहीर केली. या निर्णयामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police sub inspector finally promoted movement list promotions announced atmosphere of joy ysh

ताज्या बातम्या