नागपूर : सूक्ष्म कण प्रदूषकांमध्ये (पीएम २.५) सर्वाधिक तीव्र वाढ झालेल्या २० शहरांपैकी १८ शहरे भारतातील आहेत. २०१० ते २०१९ या कालावधीत करण्यात आलेल्या सात हजार शहरांसाठीच्या वायू प्रदूषण आणि जागतिक आरोग्यावरील परिणामांचा व्यापक आणि तपशीलवार विश्लेषणात्मक अभ्यास बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिटय़ूटने (एचईआय) प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील एक असलेल्या दिल्लीमध्ये सूक्ष्म कण प्रदूषकांची सरासरी पातळी सर्वात जास्त आहे. या विश्लेषणामध्ये सर्वाधिक हानिकारक प्रदूषकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. यात सूक्ष्म कण प्रदूषक आणि नायट्रोजन डायऑक्साईडचा समावेश आहे. ‘शहरांमधील हवेची गुणवत्ता आणि आरोग्य’ या अहवालात जगभरातील शहरांसाठी हवेच्या गुणवत्तेचा अंदाज तयार करण्यासाठी उपग्रह आणि मॉडेल्ससह जमिनीवर आधारित हवेच्या गुणवत्तेचा डाटा एकत्रित करण्यात आला. २०१९ मध्ये, सात हजार २३९ शहरांमध्ये सूक्ष्म कण प्रदूषकाच्या संसर्गाशी संबंधित कारणांमुळे १.७ दशलक्ष मृत्यू झाले. यात आशिया, आफ्रिका, पूर्व आणि मध्य युरोपमधील शहरांतील नागरिकांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आले.

Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच
Top Companies, Lose, Rs 1.97 Lakh Crore , market valuation, infosys, tcs, hdfc bank, hindustan unilever, finance, financial knowledge, financial year end,
आघाडीच्या १० कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना बाजारभांडवलात १.९७ लाख कोटींची घट

प्रत्येक विभागातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये, दिल्ली आणि कोलकाता हे पहिल्या दहामध्ये आहेत. या दोन्ही शहरात सूक्ष्म कण प्रदूषकाशी संबंधित आजाराचे प्रमाण अधिक आहे. २० शहरांमध्ये भारत, नायजेरिया, पेरु आणि बांगलादेशमधील नागरिक सूक्ष्म कण प्रदूषकांच्या संपर्कात आले आहेत. जे जागतिक सरासरीपेक्षा अनेक पटींनी अधिक आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. भारत आणि इंडोनेशियामध्ये सूक्ष्म कण प्रदूषकांमध्ये सर्वात जास्त वाढ झाली आहे तर चीनमध्ये सर्वात मोठी सुधारणा दिसून आली आहे. सात हजार २३९ शहरांमध्ये भारतातील २० शहरांपैकी १८ शहरे आहेत, ज्यात २०१० ते २०१९ या काळात सूक्ष्म कण प्रदूषणात सर्वाधिक वाढ झालेली दिसून आली. इतर दोन शहरे इंडोनेशियामध्ये आहेत, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले केले. सूक्ष्म कण प्रदूषकांमध्ये सर्वात तीव्र वाढ झालेल्या ५० शहरांपैकी ४१ भारतातील आणि नऊ इंडोनेशियामधील आहेत. २०१० ते २०१९ मध्ये सूक्ष्म कण प्रदूषकांमध्ये सर्वाधिक घट झालेल्या २० शहरांपैकी सर्व चीनमध्ये आहेत. सूक्ष्म कण प्रदूषणाचा धोका कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील शहरांमध्ये जास्त असतो. तर उच्च उत्पन्न असलेल्या तसेच कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील शहरांमध्ये नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असते. या अहवालात कमी आणि मध्यम-उत्पन्न  देशांमधील डाटा अंतरांवरही प्रकाश टाकला आहे, जो वायू प्रदूषणाच्या आरोग्यावरील परिणामांना समजून घेण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.

नऊपैकी एका मृत्यूसाठी वायू प्रदूषण जबाबदार

जागतिक आरोग्य संघटनेच्या वायू गुणवत्ता डाटानुसार, सूक्ष्म कण प्रदूषकाचा मागोवा घेण्यासाठी सध्या फक्त ११७ राष्ट्रांकडे जमीन पातळीवरील देखरेख यंत्रणा आहे आणि ७४ राष्ट्र नायट्रोजन डायऑक्साईड पातळीचे निरीक्षण करत आहेत. जगभरात, नऊपैकी एका मृत्यूसाठी वायू प्रदूषण जबाबदार आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे.