नागपूर : सूक्ष्म कण प्रदूषकांमध्ये (पीएम २.५) सर्वाधिक तीव्र वाढ झालेल्या २० शहरांपैकी १८ शहरे भारतातील आहेत. २०१० ते २०१९ या कालावधीत करण्यात आलेल्या सात हजार शहरांसाठीच्या वायू प्रदूषण आणि जागतिक आरोग्यावरील परिणामांचा व्यापक आणि तपशीलवार विश्लेषणात्मक अभ्यास बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिटय़ूटने (एचईआय) प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील एक असलेल्या दिल्लीमध्ये सूक्ष्म कण प्रदूषकांची सरासरी पातळी सर्वात जास्त आहे. या विश्लेषणामध्ये सर्वाधिक हानिकारक प्रदूषकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. यात सूक्ष्म कण प्रदूषक आणि नायट्रोजन डायऑक्साईडचा समावेश आहे. ‘शहरांमधील हवेची गुणवत्ता आणि आरोग्य’ या अहवालात जगभरातील शहरांसाठी हवेच्या गुणवत्तेचा अंदाज तयार करण्यासाठी उपग्रह आणि मॉडेल्ससह जमिनीवर आधारित हवेच्या गुणवत्तेचा डाटा एकत्रित करण्यात आला. २०१९ मध्ये, सात हजार २३९ शहरांमध्ये सूक्ष्म कण प्रदूषकाच्या संसर्गाशी संबंधित कारणांमुळे १.७ दशलक्ष मृत्यू झाले. यात आशिया, आफ्रिका, पूर्व आणि मध्य युरोपमधील शहरांतील नागरिकांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Polluted cities india report health effects institute ysh
First published on: 20-08-2022 at 00:02 IST