scorecardresearch

वर्धाच्या पूजा व्यास यांनी जिंकला ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल जीओ क्विन’चा किताब

सावंगी येथील मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत पूजा कार्यरत आहेत.

Pooja Vyas
'मिसेस इंडिया इंटरनॅशनल जीओ क्विन' हा किताब जिंकला

राष्ट्रीय पाठोपाठ आंतरराष्ट्रीय सौंदर्यवतीचा किताब पटकविण्यात वर्धाच्या पूजा व्यास यांनी पटकावला आहे. अशा दुहेरी किताबाच्या त्या विदर्भातील पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.

पूजा व्यास यांनी रविवारी रात्री कोलकाता येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल जीओ क्विन’ हा किताब जिंकला. यापूर्वी ९ मे रोजी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी ‘मिसेस इंडिया’चा किताब पटकावला होता.

एकूण तीस स्पर्धकांमध्ये चुरस

सावंगी येथील मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत पूजा कार्यरत आहेत. अशा सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. तिचे प्रेरणास्थान व विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ संदीप श्रीवास्तव यांनी ही बातमी लोकसत्ताशी शेअर करत आनंद व्यक्त केला.

संदीप श्रीवास्तव म्हणाले, की दोन मुलींची आई असलेल्या पूजा यांनी वर्षभरात घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. संस्थेचे विश्वस्त सागर मेघे यांनी सहकार्य केल्यानेच पूजा भरारी घेऊ शकली. तिचे यश संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. एकूण तीस स्पर्धकांमध्ये ही चुरस होती. त्यात पूजा अव्वल आली.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pooja vyas won the mrs india international geo queen competition