वादग्रस्त दृश्ये व विरोधामुळे गाजत असलेला पठाण चित्रपट आज जिल्ह्यातही प्रदर्शित झाला. खामगाव शहरात शाहरुख खानच्या पठाणला हिंदुत्ववादी संघटनांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तिथे चित्रपट गृहासमोर निदर्शने करून पोस्टर फाडण्यात आले.राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या खामगाव नगरीतील ‘सनी पॅलेस’ मध्ये हा चित्रपट सुरू आहे.

हेही वाचा >>>नाशिक : बनावट माहितीपत्रकाच्या आधारे घेतले कर्ज, आयडीएफसी फर्स्ट बँकेला ५४ लाखांचा चुना

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Vijay Salvi in ​​Kalyan
कल्याणमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांच्या शिवशाही-ठोकशाही चित्ररथाला पोलिसांची हरकत
Liquor stock worth 28 lakh seized Gadchiroli action befor elections
गडचिरोली : २८ लाखांचा मद्यसाठा जप्त; निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

दरम्यान आज बुधवारी( दि २५) विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी ‘निषेध रॅली’ काढली. चित्रपट गृहासमोर निदर्शने करून ‘शाहरुख खान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी पठाणचे पोस्टरही फाडले. बजरंग दलाचे विदर्भ संयोजक अमोल अंधारे यांनी चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.