scorecardresearch

विद्युत पुरवठा ठप्प;  गोंडवाना विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ‘पेट’ परीक्षेत गोंधळ

गोंडवाना विद्यापीठातर्फे गडचिरोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.

विद्युत पुरवठा ठप्प;  गोंडवाना विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ‘पेट’ परीक्षेत गोंधळ
गोंडवाना विद्यापीठ

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशाकरिता बुधवारी घेण्यात आलेल्या ‘पेट’ परीक्षेत ऐन पेपर सुरू असतानाच चार ते पाचवेळा विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या केंद्रावर हा प्रकार घडला.

गोंडवाना विद्यापीठातर्फे गडचिरोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. पेपरदरम्यान वारंवार वीज गेल्याने मोठा अडथळा निर्माण झाला. परीक्षा ऑनलाईन असल्याने महाविद्यालय प्रशासनाकडून आधीच पूर्वतयारी करायला हवी होती. मात्र, ढीसाळ नियोजनामुळे परीक्षार्थींना अडचणींचा सामना करावा लागल्याने रोष व्यक्त होत आहे. या संदर्भात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, परीक्षा सुरू असताना वीज गेल्यास पुढे वाढीव वेळ देण्यात येतो. जर कुणाला तरीही अडचण निर्माण झाली असल्यास त्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत विद्यापीठ प्रशासन काळजी घेईल.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या