power supply interruption disturb in pet exam conducted by gondwana university zws 70 | Loksatta

विद्युत पुरवठा ठप्प;  गोंडवाना विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ‘पेट’ परीक्षेत गोंधळ

गोंडवाना विद्यापीठातर्फे गडचिरोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.

विद्युत पुरवठा ठप्प;  गोंडवाना विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ‘पेट’ परीक्षेत गोंधळ
गोंडवाना विद्यापीठ

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशाकरिता बुधवारी घेण्यात आलेल्या ‘पेट’ परीक्षेत ऐन पेपर सुरू असतानाच चार ते पाचवेळा विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या केंद्रावर हा प्रकार घडला.

गोंडवाना विद्यापीठातर्फे गडचिरोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. पेपरदरम्यान वारंवार वीज गेल्याने मोठा अडथळा निर्माण झाला. परीक्षा ऑनलाईन असल्याने महाविद्यालय प्रशासनाकडून आधीच पूर्वतयारी करायला हवी होती. मात्र, ढीसाळ नियोजनामुळे परीक्षार्थींना अडचणींचा सामना करावा लागल्याने रोष व्यक्त होत आहे. या संदर्भात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, परीक्षा सुरू असताना वीज गेल्यास पुढे वाढीव वेळ देण्यात येतो. जर कुणाला तरीही अडचण निर्माण झाली असल्यास त्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत विद्यापीठ प्रशासन काळजी घेईल.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस, वीज कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू, तीन मुले जखमी

संबंधित बातम्या

यवतमाळ : शेतकरी कन्येने शिकवणी वर्गाशिवाय ‘नीट’ परीक्षेत मिळवले ६१० गुण
“शिंदे गट आणि मनसे एकत्र…”; BMC Election संदर्भातील ‘तो’ प्रश्न ऐकताच फडणवीस हसत म्हणाले, “मला खूप मजा येते जेव्हा…”
दस-यानिमित आपट्याची पाने वाटण्याची प्रथा वृक्षाच्या मुळावर; ओरबडण्याच्या वृत्तीमुळे वृक्ष प्रजातीची दुर्मिळ श्रेणीकडे वाटचाल
कॅनडा, इंग्लंडच्या धर्तीवर आरोग्य यंत्रणा लाभदायक ; कॅनडाच्या डॉ. स्मिता पखाले यांचे मत
नागपूर : मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार, महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

व्हिडिओ

ताज्या बातम्या
कास पठाराला घातलेले कुंपण काढण्यास सुरुवात
केंद्राने देशभर समान नागरी कायदा लागू करावा!; शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत : राज
विश्लेषण : रॉय दाम्पत्याचे काय चुकले? 
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे