शहरातील आदर्श सिनेमागृहात बुधवारी पठाण चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निषेधार्थ सिनेमागृहासमोर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंच, हिंदू रक्षा मंच, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत विरोध केला.यावेळी कार्यकर्त्यांनी पठाण सिनेमाचे पोस्टर जाळले आणि पोस्टरवर काळी शाही फेकून निषेध नोंदविला. यावेळी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. दरम्यान, भंडारा पोलिसांच्या समयसुचकतेने पुढील अनर्थ टळला आणि कार्यकर्त्यांचे आंदोलन शांत झाले.

हेही वाचा >>>गडचिरोली: भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून शिंदे-फडणवीसांना ‘संताजी-धनाजी’ची उपमा, वाचा काय म्हणाले ते…

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर “पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. चित्रपटात दीपिका, शाहरुख आणि जॉनचे दमदार स्टंट पाहायला गर्दी होत आहे. पण बेशरम रंग या गाण्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

हेही वाचा >>>नागपूर ग्रामीणचे ओमप्रकाश कोकाटे यांना राष्ट्रपती पोलीस पदक

या चित्रपटातील “बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झाल्यापासूनच काही ठिकाणी त्याला कडाडून विरोध करण्यात आला आहे. या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या कपड्यांवर आक्षेप घेण्यात आला. सोशल मीडियावरही या सर्व प्रकरणात दोन गट पडलेले होते. यामध्ये काहींनी पठाणला समर्थन दिले आहे तर काहींनी जोरदार विरोध केला आहे. अशातच ‘पठाण’ विरोधात भंडाऱ्यात बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहे. ‘पठाण’ ला सुरुवातीपासूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे. आता प्रदर्शनानंतरही विरोध होत आहे.