गोंदिया : महापुरुषांचा आदर्श विचारांचा ठेवा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्राला अशा अगदी खालच्या पातळीवरचे वक्तव्य शोभणारे नाही. तीच बाब सुसंस्कृत भाषेतून पण बोलली जाऊ शकत होती. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीकडून अशी वक्तव्य होणे हे अशोभनीय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेको घराण्यांचे राजकीय वैर होते आणि अद्यापही आहेत, पण ते कधी या पातळीपर्यंत गेले नाहीत. यामुळे त्यांनी संयम बाळगावा, असा सल्ला खासदार प्रफुल पटेल यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता दिला. गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शुक्रवारी आमगाव येथे कार्यकर्ता मेळाव्यात आले असता. माध्यमांनी त्यांना विचारलेल्या उध्दव ठाकरे यांच्या " एक तर तू राहीन किंवा मी राहीन" या प्रश्नावर उत्तर देताना बोलत होते. पुढे प्रफुल पटेल म्हणाले की महाराष्ट्रच्या आता पर्यंतच्या राजकारणात इतर ही राजकीय वैर वेळी वेळी दिसून येतात पण त्यांच्यात ही कधी इतक्या खालच्या पातळीवर टीका किंवा धमकी दिली गेली असेल हे माझ्या तरी ध्यानी मनी नाही. तसेच राज्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये पेन ड्राइव वरून पेटलेला आहे. यावर प्रफुल पटेल यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सल्ला देत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या स्तर इतका खाली येऊ देऊ नका… यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते… असा सल्ला दिला आहे. हेही वाचा.चंद्रपूर : ४० जिवंत काडतुसे, तलवार व वाघनख… युवा सेना जिल्हाप्रमुखाच्या घरून शस्त्रसाठा जप्त राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष कोणत्या जागेवर लढणार यावर पक्षातील वरिष्ठांच्या अनेक बैठकांचा माध्यमातून चर्चा सुरू आहेत. यावर प्रफुल पटेल यांनी सांगितले की महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत. योग्य पद्धतीने जागांचा वाटपही होणार आहे. मात्र, कोणता पक्ष कुठे लढेल अद्यापही याबद्दल चर्चा झालेली नाही असे त्यांनी सांगितले.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते मात्र त्यांच्यासोबत छगन भुजबळ हे दौऱ्यामध्ये नव्हते. यावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीचा कुठलाही वेगळा अर्थ अनर्थ काढू नका आम्ही महायुती म्हणून सगळे नेते सोबतच आहोत असे म्हणाले. हेही वाचा.गडचिरोली : फेरफारसाठी शेतकऱ्याकडे पैश्यांची मागणी; लाचखोर मंडळाधिकारी, तलाठी अटकेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेषांतर करून दिल्लीला गेल्याचा आरोप विरोधकांने केले होते, यावर अजित पवार यांनी पलटवार करत ‘मी वेषांतर करुन कुठेही गेलो नाही, आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता ते म्हणाले की मला अश्या किरकोळ फालतूचा गोष्टीवर जे विरोधक चर्चा करतात त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. अजित पवार हे महाराष्ट्राला चांगले नेतृत्व मिळाले आहेत आणि त्यांच्यावर अशी खालच्या स्तरावर चर्चा करून टीका करणे हे योग्य नाही असे प्रफुल पटेल म्हणाले.