सध्या देशातील वातावरण बघता प्रत्येकाने भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. कामगार मंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पेन्शनचा अधिकार मिळवून दिला. परंतु, नंतर ती बंद करण्यात आली. ही योजना बंद करण्यात भाजपसोबत अन्य पक्षांचाही सहभाग आहे. खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी ही योजना बंद करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘नागपूर शहरातील मैदानाच्या विकासासाठी शंभर कोटी देणार’; फडणवीस यांची घोषणा

वंचित बहुजन आघाडीतर्फे शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रा. प्रदीपकुमार खोब्रागडे यांच्या प्रचारासाठी आंबेडकर नागपूरमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, काळानुरूप बदल आवश्यक आहे. शिक्षणातील धोरणाला विरोध नाही. परंतु, नियोजन करून त्यात बदल करायला हवे. पहिल्यांदा ज्यावेळी बदल झाला, त्यावेळी पाच वर्षे गोंधळाची स्थिती होती. शिक्षकांना पूर्ण माहिती नव्हती. सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक ‘अनस्कील’ राहत आहे. नवे शिक्षण धोरण राबवताना यावर विचार करण्याची गरज आहे. अमरावती नागपूर विद्यापीठांतर्गत ८ हजार प्राध्यापक नेट-सेट नसल्यामुळे कायमस्वरुपी नाही. त्यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यांचा शिक्षणाचा अनुभव लक्षात घेता, सरकारने त्यांचा कायम करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले पाहिजे.

हेही वाचा- “…तर काँग्रेस केवळ निवडणूक पोस्टरवरच उरेल”, सुनील केदारांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना इशारा

गडचिरोलीच्या सूरजागड खाणीतील लोह महाराष्ट्र वगळता इतर राज्यांना देण्यात येत आहे. येथे प्रकल्प सुरू झाल्यास २० हजार लोकांच्या हाताला काम मिळेल, असे आंबेडकर म्हणाले. यावेळी प्रा. दीपककुमार खोब्रागडे, रवी शेंडे, राजू लोखंडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा- कुलगुरू, संशोधकही जेवणासाठी ताटकळले; ‘इंडियन फार्मास्युटीकल कांग्रेस’मध्ये नियोजनाचा अभाव

‘काँग्रेस, राष्ट्रवादीला युतीत घेण्यास विरोध नाही’

उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत युती करण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेण्याची भूमिका उद्धव ठाकरेंची असून आमचा त्याला विरोध नाही. त्यांनी ठरवायचे आहे. आमची युती ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे निवडणुकीत कुणासोबत व कसे ‘शेअरिंग’ करायचे हे ते ठरवतील, असे आंबेडकर म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar criticizes the state government after closing the old pension scheme adk 83 dpj
First published on: 23-01-2023 at 09:57 IST