नागपूर : भारताने अमेकिरेकेसोबत केलेल्या करारावर टीका होत आहे. या करारामुळे कृषी क्षेत्रावर परिणाम होणार असल्याचा आरोप होत आहे. या करारामुळे फक्तक्षकृषीच नाही तर उद्योग व आर्थिक धोरणावरही परिणाम होणार आहे. भारताचे धोरण हे अमेरिका ठरवेल. भाजप व आरएसएसच्या सरकारने या कराराच्या माध्यमातून भारताचे सार्वभौमत्व अमेरिकेकडे गहाण ठेवले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, पूर्वी अमेरिकेकडे फक्त अडीच टक्केच निर्यात शुल्क लागत होते. आता १८ टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. तर त्यांच्याकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर शून्य टक्के शुल्क लागणार आहे. सरकारने केलेल्या करारानुसार अमेरिका उद्योग, आर्थिक धोरणावर सुद्धा लक्ष ठेवेल. हे धोरणही तेच निश्चित करतील. त्यामुळे भारताचे स्वातंत्र्यच हर वले गेले.

परंतु कृषी व्यतिरिक्त इतर विषयावर विरोधक बोलत नाही. त्यांनी यावर बोलते व्हावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. एपस्टीन फाइलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे नाव आले आहे. याची सर्व माहिती अमेरिकाला आहे. मोदीना ब्लॅकमेल केले जात आहे. ‘मुद्रा मोदी आता मुजरा मोदी’ झाल्याची टीका त्यांनी केली.

या एपस्टीन फाइलमध्ये नाव आलेल्यांवर विदेशात कारवाई होत आहे. भारतातील तीन जणांचे नाव आले आहे. परंतु एकावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री मोदी यांच्या राजीनाम्यासाठी २ मार्चला मुंबईत आंदोलन करण्यात येणार असून यात सर्व विरोधी पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

रशियाचे स्वस्त तेल खरेदी बंद करण्याचा खुलासा करावा

अमेरिकाकडून स्वस्तात तेल मिळत होेते. परंतु हे तेल खरेदी करणे भारतने बंद केले आहे. अमेरिकेच्या सांगण्यावरून इतर ठिकाणाहून तेल खरेदी करण्यात येत आहे. रशियाचे स्वस्त तेल खरेदी करणे बंद का करण्यात आले, याचा खुलासा करावा, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

इराणसोबत युद्ध झाल्यास अमेरिका भारताच्या जागेचा विमान उतरविण्यास किंवा तेल भरण्यास वापर करेल. त्यामुळे या युद्धात भारताचा अप्रत्यक्ष सहभाग असेल. भारताला यातून दूर राहण्याचे स्वातंत्र्य नसेल. मोदींनी भारताला अमेरिकेचे ५१ राज्य केल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.

फ्रान्सने राफेलचे कोड दिले नाही

भारताने फ्रान्सकडून राफेल विमान खरेदी केले. परंतु या विमानाचे कोड दिले नाही त्यामुळे त्याच्या रडार क्षमतेचा वापर झाला नाही आणि विमान पडले, असा दावाही आंबेडकर यांनी केला. आता पुन्हा ११४ विमाने खरेदी करण्यात येणार आहे. आता कंपनी विमानाचे कोड देतील का, याचाही खुलासा झाला पाहिजे. कंपनीने कोड न दिल्यास हे विमान फक्त लोखंड ठरेल, असेही ते म्हणाले.