महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळाची चर्चा सध्या देशभरात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर भाजपा – शिवसेना राजकीय यांच्यातील वाद समोर आला आहे. दरम्यान, विश्व हिंदू परीषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया नागपूर विमानतळावर आले असता त्यांनी या वादावार भाष्य केले. “हे राजकारण आहे. यात सर्व चालतं आज भाजपा-शिवसेना जरी विरोधात असले तरी ते उद्या एका ताटात जेवतील. हे कधी भांडतील तर कधी एकमेकांच्या गळ्यात पडतील. उद्धव ठाकरे असतील नारायण राणे असतील यांचं हे सुरुच राहील”, असे प्रवीण तोगडिया म्हणाले.

तोगडिया म्हणाले, “देशात १० करोड बेरोजगार आहेत. महागाई वाढली आहे. शेतकरी संकटात आहे. त्यामळे सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे आणि लढा द्यायला हवा. विरोधक प्रयत्न करत आहेत. पण हा प्रयत्न एकजुटीने व्हायला हवा.”

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा देखील…

“देशाच्या हितात जे काम करतील त्यांच्या बाजूने आम्ही राहू. भाजपाने देशाच्या हितात काम केले तर आम्ही भाजपा जिंदाबाद म्हणू, शिवसेनेने काम कले तर शिवसेना जिंदाबाद म्हणू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा देखील जय म्हणू. आम्ही आता कोणत्या दलाचे गुलाम नाही आहोत. जे देश हिताचे काम करतली त्यांच्या बाजूने आम्ही असू,” असे प्रवीण तोगडिया म्हणाले.

हेही वाचा – …तर मी राजकारणातून संन्यास घेईन; उदय सामंतांनी केलं जाहीर

प्रवीण तोगडिया यांनी सध्याच्या स्थितीत भारताला तालिबानकडून मोठा धोका असल्याचे मत देखील व्यक्त केले. भारतात तालिबानी विचारधारेचे केंद्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच जे शरणार्थी भारत अफगाणिस्थान मधून आणत आहेत त्यांचीच पिढी भविष्यात आपल्या पोलिसांना मारतील याचे उदाहरण फ्रान्स मध्ये पहावयास मिळाले आहे असेही ते बोलले.