चंद्रपूर: दिल्ली येथील सेंट्रल व्हिस्टा पाठोपाठ अयोध्येतील राम मंदिरासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उच्च प्रतिचे सागवान लाकूड पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वन अकादमी येथे आयोजित ३५ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन कार्यक्रमानंतर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगल, या जंगलात वास्तव्याला असलेले २०३ वाघ, बिबट, हरीण, चितळ, सांबर पाठोपाठ विविध पक्षी, फुलपाखरू वन्यजीव व पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षणाचे व अभ्यासाचे केंद्र ठरले आहे. त्यासोबतच देशासोबतच जागतिक पर्यटक देखील या जिल्ह्याकडे आकर्षित झाला आहे. या सर्वांपाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील मौलिक सागवान देखील देशातील अनेक आकर्षक व देखण्या इमारतींमध्ये वापरले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेतून दिल्ली येथे आकाराला येत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा या इमारतीत चंद्रपूरचे उच्च प्रतिचे सागवान वापरण्यात आले आहे.

Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
kalyan woman gudi making business marathi news,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी कल्याणची गुढी

हेही वाचा >>> चंद्रपूर जिल्ह्यात केवळ ४८.५० टक्के शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ; ३२,६७५ शेतकरी अद्यापही वंचित

आता तर अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिरात देखील चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान वापरण्यात येणार आहे. लवकरच या सागवानाची निवड करण्यासाठी अयोध्येतून एक चमू चंद्रपूरला येणार आहे. राम मंदिराचे काम असल्याने त्यासाठी अतिशय माफक दरात हे सागवान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. राम मंदिराचे महाद्वार तथा मंदिरातील इतर अनेक ठिकाणी चंद्रपूरचे सागवान वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे सागवान अतिशय उच्च प्रतिचे आहे. मंदिरात ठिकठिकाणी या सागवानाचा वापर होणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.