scorecardresearch

गडचिरोली पोलीस दलातील ४१ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक

दोन जवानांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

गडचिरोली पोलीस दलातील ४१ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक
संग्रहित छायाचित्र

पोलीस दलात कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी करणा­ऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी गडचिरोली पोलीस दलातील ४१ अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व २ पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदकाने सन्मानित करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांमध्ये पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया भापोसे. अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक संदिप भांड, पोनि संदिप मंडलिक, सहायक पोलीस निरीक्षक, सपोनि मोतिराम मडावी, सपोनि योगिराज जाधव, पोउपनि राजरत्न खैरनार, पोउपनि दयानंद महाडेश्वर, पोउपनि हर्षल जाधव, शहीद पोेउपनि धनाजी होनमाने (मरणोत्तर), पोहवा. स्व. जगदेव मडावी (मरणोत्तर), पोहवा. सेवकराम मडावी, नापोशि राजू कांदो, नापोशि दामोधर चिंतुरी, नापोशि राजकुमार भलावी , नापोशि सागर मुल्लेवार, नापोशि शंकर मडावी, नापोशि रमेश आसम , नापोशि जिवन उसेंडी , नापोशि राजेंद्र मडावी, नापोशि मनोज गज्जमवार, नापोशि सुभाष गोंगले , नापोशि दसरू कुरसामी , पोशि अविनाश कुमरे, पोशि गोंगलु तिम्मा , पोशि महेश सयाम, पोशि साईकृपा मिरकुटे , पोशि रत्नय्या गोरगुंडा, पोशि विलास पदा, पोशि मनोज इस्कापे, पोशि अशोक मज्जी, पोशि देवेंद्र पाकमोडे, पोशि रोहित गोंगले , पोशि दिपक विडपी , पोशि सुरज गंजिवार , पोशि गजानन आत्राम , शहीद पोशि किशोर आत्राम (मरणोत्तर), पोशि योगेश्वर सडमेक, पोशि अंकुश खंडाळे या जवानांना राष्ट्रपतीचे पोलीस शौर्य पदक मिळाले असून, सहा.फौ/ प्रवीण बेझलवार व सहा.फौ. प्रमोद ढोरे यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहेत.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोेलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असताना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक बहाल करण्यात आलेले आहे. गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या