नागपूर: सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३- व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी विधेयक यावरील सूचना मागविणे सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३- व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी हे विधेयक  महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळे,  यांच्या अध्यक्षतेखाली घटित केलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठविण्यात आले आहे.

या विधेयकातील विषयाबाबत राज्यातील जनता, विधिमंडळाचे माजी सदस्य तसेच संबंधित विषय क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था/संघटना स्वंयसेवी संस्थां यांचेकडून सूचना, सुधारणा मागविण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यानुसार सूचना/सुधारणा पाठवू इच्छिणाऱ्या उपरोक्त संबंधितांनी आपल्या सूचनासुधारणा प्रत्येकी तीन प्रतींमध्ये निवेदनाच्या स्वरूपात मंगळवार, दिनांक ०१ एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा बेताने  जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन बॅकबे रेक्लमेशन, मुंबई- ४०००३२ यांच्याकडे पाठवाव्या.