लोकसत्ता टीम
नागपूर: केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठी कपात केल्यापासून नागपूरसह देशभरात सातत्याने सोने- चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरतांनाचे चित्र होते. त्यामुळे या दराने गेल्या काही महिन्यांतील निच्चांकी पातळी गाठली असतांनाच आता पुन्हा सोन्याच्या दरात वारंवार बदल होऊन ते वाढत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी (२९ जुलै)च्या दुपारी २ वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६४ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार २०० रुपये नोंदवण्यात आले. हे दर सोमवारी (२९ जुलै) बाजार उघडल्यावर सकाळी १० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६९ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६४ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ४०० रुपये होते. त्यामुळे सकाळच्या तुलनेत दुपारी दरात किंचित घट झाली.
आणखी वाचा-शंभर वर्ष जुन्या इमारतीचा व्यावसायिक वापर, उच्च न्यायालयात प्रकरण…
दरम्यान सोन्याचे दर अर्थसंकल्पापूर्वीच्या दिवशी सोमवारी (२२ जुलैला) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ७०० रुपये होते. तर अर्थसंकल्प असलेल्या दिवशी अर्थसंकल्प जाहिर झाल्यावर सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू झाली. या दिवशी (२३ जुलै) संध्याकाळी नागपुरातील सराफा बाजार बंद होतांना २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले.
दरम्यान हल्ली काही प्रमाणात सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळत असली तरी लवकरच सोन्याचे दर वाढण्याची शक्यता नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या सोन्यात ग्राहकांसाठी गुंतवणीकीची चांगली संधी असल्याचे या व्यवसायिकांचे म्हणने आहे. दरम्यान नागपुरात प्लॅटिनमचे दरही सोमवारी प्रति दहा ग्राम ४३ हजार रुपये होते. हे दर अर्थसंकल्पापूर्वी ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम होते.
आणखी वाचा-जेईई मेन्स परीक्षेत एकाच विद्यार्थ्याला वेगवेगळे गुण,‘एनटीए’ला उच्च न्यायालयाची नोटीस
हे आहेत चांदीचे दर..
नागपुरातील सराफा बाजारात अर्थसंकल्प जाहिर झाल्यावर (२३ जुलै) रात्री बाजार बंद होतांना चांदीचे दर प्रति किलो ८५ हजार ८०० रुपये होते. हे दर २९ जुलैच्या दुपारी ८३ हजार १०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे २३ जुलैच्या तुलनेत २९ जुलैच्या दुपारी चांदीच्या दरात २ हजार ७०० रुपये प्रति किलो घट झाली आहे.
© The Indian Express (P) Ltd