अकोला : देशातील ‘स्टार्ट अप’ केवळ मोठ्या शहरांपुरताच मर्यादित राहिला नाही. छोट्या शहरातील उद्योगांच्या ‘स्टार्ट अप’चे नेतृत्व युवती व महिला करीत आहेत. देशातील वाशीमसह सात शहरे ‘स्टार्ट अप’चे केंद्र बनत आहेत. हे पाहून माझ्यासह सगळ्याच भारतीयांचे मन आनंदाने भरून जाते, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जानेवारीला ‘मन की बात’ कार्यक्रमाचा ११८ वा भाग सादर केला. ‘मन की बात’ हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर केला जातो. मात्र, पुढच्या रविवारी २६ जानेवारी म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन असल्याने ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामलल्ला मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा, कुंभमेळा, राष्ट्रीय मतदार दिवस, स्टार्ट अप इंडिया यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘स्टार्ट अप इंडिया’ची उपलब्धी सांगतांना नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. वाशीम जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये समावेश आहे.

manbendra nath roy influenced on tarkteerth lakshman shastri joshi zws 70
तर्कतीर्थ विचार : मार्क्सवाद व नवमानवता
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
Rahul Gandhi Critized Mohan Bhagwat
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…”
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
PM Modi Addresses Public Rally At RK Puram In Delhi
दिल्ली प्रचाराची आज सांगता!पंतप्रधानांकडून अर्थसंकल्पाची प्रशंसा; विरोधकांवर टीका
Suhas Hiremath , Karad, India culture,
दातृत्व अन् त्यागाची भारत देशाची संस्कृती, सुहास हिरेमठ यांचे गौरवोद्गार
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”

हेही वाचा >>>डॉ. मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसचे संघ मुख्यालयासमोर आंदोलन

आपल्या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी अत्यंत आवड व समर्पण भावना आवश्यक असते. उत्साह, नावीन्यपूर्ण व सर्जनशीलतेतून यशस्वी होण्याचा मार्ग निघतो. काही दिवसांपूर्वीच देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या युवकांसोबत दिवस घालवण्याचा योग आला. युवकांनी विविध क्षेत्रातील संकल्पना मांडल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

‘स्टार्ट अप इंडिया’ला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. या काळात देशात जेवढे स्टार्ट अप सुरू झाले, त्यापैकी निम्मे लहान व मध्यम शहरात सुरू झाले आहेत. हे ऐकून सर्व भारतीय आनंदित झाले. ‘स्टार्ट अप’ संकल्पना केवळ मोठ्या शहरांपुरतीच मर्यादित राहिली नाही. छोट्या शहरातील निम्म्यापेक्षा अधिकच्या ‘स्टार्ट अप’चे नेतृत्व युवती करीत आहेत. देशातील अंबाला, हिसार, कंगारा, चेंगलपट्टू, बिलासपूर, ग्वालेर आणि वाशीम सारखे शहरे ‘स्टार्ट अप’चे केंद्र बनत आहेत. त्यामुळे मन आनंदाने भरून जाते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अविकसित व दुर्लक्षित जिल्हा म्हणून वाशीमची ओळख होते. मात्र, आता पंतप्रधानांनी ‘स्टार्ट अप’ सुरू होण्याचे केंद्र म्हणून वाशीमचा देशपातळीवर उल्लेख केला. वाशीम सारख्या लहान शहरातील ‘स्टार्ट अप’ची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट ‘मन की बात’ कार्यक्रमात घेतल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

Story img Loader