नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यजमानपद भूषवत असलेल्या १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष येणार नसून दृकश्राव्य माध्यमातून उद्घाटन करणार असल्याचे आयोजन समितीकडून कळवण्यात आले आहे. यामुळे पंतप्रधान उपस्थित राहण्याच्या परंपरेला मात्र खंड पडणार आहे.

मंगळवारी सकाळी ९.३० वाजता भारतीय विज्ञान काँग्रेसचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विज्ञान व तंत्रज्ञान केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या सरचिटणीस डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांची उपस्थिती राहणार आहे.

Congress strongly criticized Prime Minister Narendra Modi for destroying the country reputation and democracy
मोदींकडून लोकशाहीच्या चिंध्या! काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
Narendra Modi and Rahul Gandhi
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप, श्रीलंकेला दिले होते ‘हे’ बेट!
Abhijit Gangopadhyay remark on Gandhi Godse
“गांधी आणि गोडसेंमध्ये एकाची…”, माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांची उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
( अशोक नेते, सुनील मेंढे )
मेंढे, नेतेंना उमेदवारी अमरावतीचा तिढा कायम

हेही वाचा >>> ‘हे बाळ माझे नाही, सांग कुणाचे पाप’ असे म्हणत बाळालाच बेडवरून…

भारतीय विज्ञान काँग्रेसला देश-विदेशातील संशोधक व तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असल्याने उत्सुकता होती. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी समृद्धी महामार्गासह अन्य कार्यक्रमांसाठी नागपूरला येऊन गेले. शिवाय विद्यापीठातील अनेक गैरप्रकार आणि कुलगुरूंच्या विरोधातही पंतप्रधान कार्यालयाला तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे स्वत: पंतप्रधान मोदी येणार की दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित राहणार ही चर्चा शैक्षणिक वर्तुळात होती. मात्र, आयोजन समितीकडून प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी येणार नसल्याचे अधिकृत जाहीर करण्यात आल्याने संभ्रम दूर झाला आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना ही ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ आहे.

हेही वाचा >>> नववर्षाच्या पहिल्याच दिवशी युवकाला चाकू, तलवारीने भोसकले

‘प्राईड ऑफ इंडिया’ खास आकर्षण

‘प्राईड ऑफ इंडिया’ हे या महासोहळ्याचे खास आकर्षण राहणार आहे. यामध्ये भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे समाजासाठी असलेले योगदान, त्यांचे मिळवलेले यश या प्रदर्शनात प्रदर्शित केले जाईल. जे वैज्ञानिक जगाच्या पटलावर नवकल्पना सादर करतात त्यांना जगाकडून मान्यता मिळते अशांचे प्रदर्शन येथे राहणार आहे.