वाशिम : महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपन्यातील खासगीकरण धोरणाला विरोध आणि आदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने तीन दिवसीय संप पुकारला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील ४० टक्के भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

हेही वाचा >>> MSEB Employee Strike: उपमुख्यमंत्र्यांच्या विभागात संपाला सर्वाधिक प्रतिसाद, तब्बल ९० टक्के कर्मचारी संपावर

Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब
Water scarcity in Jalgaon district
निम्म्या जळगाव जिल्ह्यात टंचाईचे संकट; ३१ गावांना ३५ टँकरद्वारे पाणी

हेही वाचा >>> MSEB Employee Strike: भंडारा शहरावरही ‘ब्लॅक आऊट’चे संकट!; जिल्ह्यातील ७७५ वीज कर्मचारी संपावर

जिल्ह्यातील ६५० कर्मचारी संपात सहभागी झाले असून १५ ते २० उपकेंद्रावर कर्मचारी हजर नसल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर वीज संकट ओढवण्याची चिन्हे आहे. जिल्ह्यातील संपकरी कर्मचारी आता चांगलेच आक्रमक झाले आहे. ‘आदानी गो बॅक’, वीज कंपन्यांचे खासगीकरण थांबवा, आदी मागण्या कर्मचा-यांकडून केल्या जात आहे. याचबरोबर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत आहे.