नागपूर मेट्रो प्रकल्पास गती मिळणार, ५९९ कोटींच्या वाढीव खर्चास मंजुरी | project of nagpur metro speed up approve 599 crore expenditure nagpur | Loksatta

नागपूर मेट्रो प्रकल्पास गती मिळणार ; ५९९ कोटींच्या वाढीव खर्चास मंजुरी

प्रकल्पाच्या बांधकामास झालेला विलंब, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या क्षेत्रात तसेच किंमतीत झालेली वाढ, दोन अतिरिक्त मेट्रो स्थानकांच्या उभारणीसह अन्य कारणांमुळे प्रकल्प किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

नागपूर मेट्रो प्रकल्पास गती मिळणार ; ५९९ कोटींच्या वाढीव खर्चास मंजुरी
नागपूर मेट्रो प्रकल्पास गती मिळणार, ५९९ कोटींच्या वाढीव खर्चास मंजुरी

नागपूर : मेट्रो प्रकल्प टप्पा-१ ला गती देण्यासाठी वाढीव ५९९ कोटींच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. त्यामुळे या प्रकल्पाची शिल्लक कामे लवकर होण्याची शक्यता आहे. मेट्रोचा मूळ प्रकल्प ८६८० कोटींचा असून त्यात ५९९ कोटींची वाढ झाल्याने सुधारित ९२७९ कोटींच्या सुधारित खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. टप्पा १- मध्ये ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान मार्गिका क्र.१ व प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर ही मार्गिका क्र.२ अशा एकूण ३८.२१५ कि.मी. लांबीच्या दोन मार्गिकांचा व ३८ स्थानकांचा समावेश आहे.

या प्रकल्पास सन २०१४ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. प्रकल्पाचा मूळ नियोजित बांधकाम कालावधी एप्रिल, २०१३ ते एप्रिल, २०१८ असा ५ वर्षांचा होता. प्रत्यक्षात जून, २०१५ मध्ये कामास सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या एकूण ३८.२१५ कि.मी. लांबीपैकी २६ कि.मी. वर सध्या मेट्रो धावत आहे. प्रकल्पाची उर्वरित १२ कि.मी. मार्गिका लवकरच कार्यान्वित होणार आहे. प्रकल्पाच्या बांधकामास झालेला विलंब, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या क्षेत्रात तसेच किंमतीत झालेली वाढ, दोन अतिरिक्त मेट्रो स्थानकांच्या उभारणीसह अन्य कारणांमुळे प्रकल्प किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Dasara 2022: विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालकांकडून मातृशक्तीचा गौरव, मातृभाषा जतन करण्याचे आवाहन

संबंधित बातम्या

भंडारा : लग्न समारंभात अन्नातून २०० जणांना विषबाधा
गडचिरोली : सरकारी डॉक्टरच बांधत होता नक्षलवाद्यांचे बॅनर; तिघांना अटक
संघाच्या विरोधात मोर्चा काढणारे वामन मेश्राम आहेत कोण?
महिलेने कानशिलात हाणल्यानंतरही प्रा. धवनकरची मग्रुरी कायम; खंडणी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
सावधान..!‘भलत्याच’ संकेतस्थळांवर मुलींचे फोटो होतात अपलोड, ‘डीपी’वर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: पिंपरी- चिंचवडमध्ये ३ पिस्तुलं, ११ जिवंत काडतुसे, ६ कोयते जप्त; सात जणांना ठोकल्या बेड्या
मुंबई: राज्यातील किमान तापमानात वाढ होणार
‘राज ठाकरे हेच खरे जातीयवादी’; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा