अनिल कांबळे

राज्यातील हवालदार, पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस निरीक्षकपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी सकारात्मक पाऊल उचलले असून लवकरच विभागीय पदोन्नती समितीची बैठक बोलावून पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे. महासंचालकांचा हा निर्णय राज्य पोलीस दलातील कनिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन वर्षांची भेट ठरणार आहे.

Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

रजनीश सेठ यांनी पोलीस दलात अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीपासून विनंती बदल्यांचाही समावेश आहे.२०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या पोलीस हवालदार यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती तसेच पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक होणे गरजेचे असते. मात्र, गेल्या एका वर्षांपासून महासंचालक कार्यालयाकडून ‘डीपीसी’ची बैठकच झाली नव्हती. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात दाखल झालेल्या रजनीश सेठ यांना पोलिसांच्या पदोन्नतीबाबत विचारणा केली असता, त्यांनी लगेच महासंचालक कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांबरोबर दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘डीपीसी’बाबत माहिती घेतली. लवकरच ‘डीपीसी’ घेऊन पोलिसांच्या पदोन्नतीचा विषय निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, ‘डीपीसी’ची बैठक लवकरच होणार असून राज्यातील पदोन्नतीचा विषय मार्गी लागणार आहे. पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांनाही पदोन्नती देण्यात येईल. तसेच २०१३ मध्ये विभागीय पात्रता परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना पदोन्नती देण्यात येणार आहे.

पोलीस दलातील विभागीय पदोन्नती समितीची बैठक आयोजित करून पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला जाणार आहे. त्याबाबत कार्यालयाला सूचना देण्यात आल्या आहेत. ५२० पोलीस हवालदारांनाही पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे.-रजनीश सेठ, पोलीस महासंचालक