scorecardresearch

वर्धा: राज्य शिक्षण मंडळाच्या आवाहनास मुख्याध्यापक संघाचा तत्पर प्रतिसाद; परीक्षांवरील संपाचे मळभ ओसरले

संपामुळे दहावी व बारावीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह उमटले होते. त्यावर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढाकार घेत विनंती केली.

12 th exam
(फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र, लोकसत्ता)

संपामुळे दहावी व बारावीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह उमटले होते. त्यावर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढाकार घेत विनंती केली. मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त मंडळाचे अध्यक्ष व शिक्षक परिवारात आदरणीय म्हटल्या जाणारे रावसाहेब आवारी यांना विनंतीपर पत्र देत मंडळाने परीक्षा संचालित करण्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले. संघटनेने आजवर मंडळास वेळोवेळी सहकार्य केले आहे.

हेही वाचा >>>नागपूर: ज्यांनी जंगल सांभाळले त्यांनाच अधिकारांपासून वंचित ठेवले! विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेची खंत

सर्वोच्च न्यायालयाने बारावीचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्याचे निर्देश दिलेच आहेत. आपण आपल्या सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परीक्षा सुरळीत पार पडण्याचे आवाहन करावे, अशी विनंती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सायंकाळी केली. त्यास प्रतिसाद देत मुख्याध्यापक संघाने परीक्षा व्यवस्थित पार पडतील, याची दक्षता घेण्याबाबत मुख्याध्यापक सहकाऱ्यांना सूचित केले. परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हित सांभाळून बेमुदत संपास सहकार्य करण्याचे निवेदन असल्याचे संघाचे पदाधिकारी सतीश जगताप यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 11:05 IST
ताज्या बातम्या