नागपूर : राज्यातील दळणवळण पायाभूत सुविधांना चालना देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत करण्याच्या हालचालींमुळे विदर्भातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पामुळे नागपूर ते गोंदिया दरम्यानचा प्रवासाचा कालावधी कमी सव्वा तासाने कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे विदर्भातील दुर्गम भाग मुख्य प्रवाहाशी अधिक वेगाने जोडला जाणार आहे.
नागपूर ते गोंदियाचे अंतर १६२ किलोमीटर आहे. त्यासाठी रस्त्यावरील वाहतूक कमी असेल आणि रस्त्याची स्थिती चांगली असल्यास सुमारे ३ तास लागतात. पण, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गला गोंदिया जोडण्यात आल्यानंतर समृद्धी ते गोंदियाचे अंतर १२७ किलोमीटर वर येणार आहे. त्यामुळे सुमारे सव्वातासाची बचत होईल.
१९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर भंडारा हा स्वतंत्र जिल्हा झाला आणि अखेरीस १९९९ मध्ये गोंदिया जिल्हा वेगळा करण्यात आला. या जिल्ह्यात धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहेत. सूर्यदेव, मांदो देवी मंदिर शहरातील हे प्रसिद्ध मंदिर भगवान सूर्याला समर्पित आहे. नागरा शिव मंदिर या मंदिराची अनोखी रचना आणि कलात्मक शैली प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. गोंदिया शहरातील हे प्रसिद्ध मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. या मंदिराची भव्य रचना आणि नाजूक कोरीव काम पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होतात. मंदिराच्या परिसरात भरपूर हिरवळ आहे, जी या ठिकाणाला एक शांत आणि भक्तिमय वातावरण देते. येथे येणारे भक्त प्रार्थना व ध्यान करून मानसिक शांतीचा अनुभव घेतात.
गोंदिया शहरातील हा ऐतिहासिक किल्ला १६व्या शतकात बांधला गेला होता. त्याच्या भव्य रचनेतून गोंदियाचा संपूर्ण नजारा पाहता येतो. इतिहासप्रेमींनी गोंदियाला भेट देताना हा किल्ला नक्की पाहायला हवा. गोंदिया शहराच्या जवळ असलेला हा निसर्गरम्य धबधबा गर्द झाडीने वेढलेला आहे.
नागझिरा अभयारण्य: गोंदिया शहराच्या जवळ वसलेले हे अभयारण्य निसर्गप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी स्वर्गच आहे. येथे वाघ, बिबटे, हरणे आणि असंख्य पशुपक्षी पाहायला मिळतात. वन्यजीवप्रेमींसाठी हा एक अनोखा अनुभव ठरतो.
नवागाव राष्ट्रीय उद्यान: या राष्ट्रीय उद्यानात वाघ, बिबटे, अस्वल, हरणे आणि अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. उद्यानातील नयनरम्य तलावावर बोटिंग आणि पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येतो. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ येथे भेट देण्यासाठी उत्तम मानला जातो.
हजरा धबधबा: गोंदिया शहराजवळील हा निसर्गरम्य धबधबा हिरव्यागार जंगलांनी वेढलेला आहे. निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात हजरा धबधब्याचे सौंदर्य अधिकच वर्धित होते, त्यामुळे हा सर्वोत्तम भेटीचा काळ आहे.
लेण्या
कचारगड लेणी: गोंदिया शहराच्या जवळ असलेल्या प्राचीन कचारगड लेण्या इतिहासप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी खास आहेत. लेण्यांच्या भिंतींवरील सुंदर कोरीव शिल्पकला पाहताना प्राचीन काळातील जीवनशैलीचा आढावा घेता येतो. समृद्धी महामार्गामुळे आधीच नागपूर आणि मुंबई ही दोन प्रमुख शहरे अधिक जवळ आली आहेत. सध्या या महामार्गावरून नागपूर ते मुंबई हे अंतर सहा ते आठ तासांत पार करता येते. या महामार्गामुळे उद्योग, शेतीमाल वाहतूक, लॉजिस्टिक्स, निर्यात तसेच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. अनेक औद्योगिक वसाहती आणि वेअरहाऊसिंग प्रकल्प या मार्गालगत उभे राहत आहेत.

