बुलढाणा : बोगस दिव्यांग विरोधी कृती समितीच्या वतीने बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज मंगळवारी धरणे करण्यात आले.
जिल्हा परिषदअंतर्गत अनेक शिक्षकांनी दिव्यांगांचे खोटे प्रमाणपत्र सादर करून ते बदलीसह इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहे. यामुळे खऱ्या दिव्यांग शिक्षकांवर अन्याय होत आहे. सर्व दिव्यांग शिक्षकांची शारीरिक चाचणी करून चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यात अशा बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्हा परिषदेने चौकशी व तपासणी कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.