scorecardresearch

Premium

बुलढाणा : पँथर सेना चढली टाकीवर! रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन

रखडलेल्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ व तातडीने काम सुरू करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे आज ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्यात आले.

Protest panther sena Buldhana District
बुलढाणा : पँथर सेना चढली टाकीवर! रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा: रखडलेल्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ व तातडीने काम सुरू करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे आज ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी वकाना (ता संग्रामपूर) येथील पाणीपुरवठा योजनेच्या टाकीवर चढल्याने प्रशासनासह तालुक्यात खळबळ उडाली.

हेही वाचा – भंडारा : आमदार भोंडेकर-परिणय फुकेंमध्ये धुसफूस! आजी आमदाराने माजी आमदाराचे नाव घेणे टाळले

Sindhi refugees in Sion Koliwada
सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा म्हाडामार्फत पुनर्विकास!
bribe for Aryan Khan release
आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच मागितल्याचा आरोप : समीर वानखडेंविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण दिल्ली मुख्यालयाकडे वर्ग
bribe for the release of Aryan Khan
आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच मागितल्याचे प्रकरण : ईडीने दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी समीर वानखडे उच्च न्यायालयात
Controversy of the agitation in 2018 to demand permanentization of contract workers Mumbai news
कंत्राटी कामगरांना कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी २०१८ मध्ये केलेल्या आंदोलनाचा वाद; महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला औद्योगिक न्यायालयाचा तडाखा

हेही वाचा – नक्षलवादी ते तेलंगणा सरकारमध्ये मंत्री; असा आहे सीताक्काचा संघर्षमय प्रवास…

मागील तीनेक वर्षांपासून रखडलेल्या चांगेफळ ते रूधाना, वकाना, खामगाव रस्त्याचे काम करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, जिल्हा निरीक्षक विजय वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली गावकरी आंदोलनात सहभागी झाले. तालुक्यातील चांगेफळ ते रूधाना वकाना खामगाव रस्त्याचे काम अपूर्ण आहे. अपघातांची मालिका सुरू असून शेकडो वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहन धारकासह ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Protest by panther sena by geting above water tank for road work incident from buldhana district scm 61 ssb

First published on: 08-12-2023 at 17:07 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×