अकोला : हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि समविचारी हिंदू संघटनांच्यावतीने बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले. निषेध करण्यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. बांगलादेशातील अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

बांगलादेशातील हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित जमले. यावेळी हिंदुंवरील अत्याचाराच्याविरोधात नारेबाजी करण्यात आली. बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतले. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवून देशातून पलायन केले. बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रुपांतर आता अराजकतेत झाले. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदुंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. बांगलादेशात २७ ठिकाणी हिंदुंना लक्ष्य करण्यात आले. जाणीवपूर्वक हिंदुंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदुंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदुंची दुकाने लुटणे, हिंदुंच्या मंदिरांची तोडफोड करणे, आग लावणे, हिंदू महिलांवर अत्याचार करणे, हिंदुंना विस्थापित करणे आदी प्रकार सुरू झाले. हिंदू नगरसेवक, पत्रकाराचीही हत्या झाली. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदुंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे, असे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे उदय महा यांनी सांगितले.

RSS Parade in Ratnagiri, RSS Ratnagiri,
रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात विरोधी घोषणा देणाऱ्या माजी नगरसेवकासह १४० जणांवर गुन्हा दाखल
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Tensions in Goa after ex RSS leader Subhash Velingkar communal remark
Tensions in Goa: संघाच्या माजी नेत्यामुळं गोव्यात तणाव; ख्रिश्चन समुदायाकडून आंदोलन तर राहुल गांधींची भाजपावर टीका
fear of unrest in Bangladesh ahead of Durga Puja
बांगलादेशात दुर्गापूजा उत्सवादरम्यान भीतीचं सावट? दुर्गापूजेला विरोधाचं काय आहे कारण?
In Consideration of a Hindu New Party in Bangladesh
बांगलादेशातील हिंदू नवीन पक्षाच्या विचारात
Thousands protested in Gondia on September 22 against attacks on women in Bangladesh
गोंदिया : हातात फलक, डोळ्यात राग; बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जनआक्रोश…
farmer leader raju shetty slam bjp over corruption issues in buldhana
राजू शेट्टी म्हणाले; महाराष्ट्र भाजपला आंदण दिलेला नाही; काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…या शेतकरी नेत्याने थेटच….
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य

हेही वाचा – भाजपच्या माजी महापौर पक्षातील आमदार, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी का करत आहेत?

हेही वाच – करावे तसे भरावे! प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले

बांगलादेशी सैन्यदलाने हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असले, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून राहू नये. भारत सरकारने हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत. तसेच उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येचा निषेध व राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराचा निषेध करून अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हिंदू विधिज्ञ परिषदेचे ॲड. मुकुंद जालनेकर, संजय ठाकूर, उदय महा, विहिप प्रखंड प्रमुख राजू मंजुळेकर, रवींद्र फाटे, ॲड. कैलास शर्मा, डॉ. संतोष पस्तापुरे, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे, शिवसेना शहर प्रमुख ॲड. पप्पू मोरवाल, योगेश अग्रवाल, आदींसह विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.