Radha Krishna Vikhe Patal criticism of Uddhav Thackeray on Dasara Melava speech | Loksatta

“उद्धव ठाकरेंचे भाषण मला ऐकायचे नाही, कारण….”; राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्याबाबत मी उत्सुक नाही. गेल्या दोन वर्षात फक्त एकच गोष्ट ते सांगत राहिले. ती म्हणजे ‘माझे कुटुंब तुमची जबाबदारी’ अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अमरावती व वर्धा येथील महसूल विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नागपूरला आले असता ते बोलत होते. हेही वाचा- नागपूर : […]

“उद्धव ठाकरेंचे भाषण मला ऐकायचे नाही, कारण….”; राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
दसरा मेळाव्यातील भाषणावरुन राधा कृष्ण विखे पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्याबाबत मी उत्सुक नाही. गेल्या दोन वर्षात फक्त एकच गोष्ट ते सांगत राहिले. ती म्हणजे ‘माझे कुटुंब तुमची जबाबदारी’ अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अमरावती व वर्धा येथील महसूल विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नागपूरला आले असता ते बोलत होते.

हेही वाचा- नागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालय परिसरात अखेर प्रभातफेरी बंद; उच्च न्यायालयाचा निर्णय

दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने शक्ती प्रदर्शन होत आहे यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार आहे. ज्यांची शक्ती गेलेली त्यांचापुढे शक्ती प्रदर्शनाचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. संघटन त्यांच्या पाठीशी उभे आहे. निश्चितपणे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने वस्तूस्थिती जनतेसमोर येईल.

हेही वाचा- जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय नियंत्रण समिती कागदावरच; आयुष्याच्या संध्याकाळी आधारासाठी धावाधाव

सर्वोच्च न्यायाच्या निर्णयाने जे काही उत्खनन संबंधी किंवा राष्ट्रीय प्रकल्पासाठी महसूल खात्याशी संबंधित काही अडचणी निर्माण झाल्या त्या सगळ्या बाबीचा आढावा बैठकीत घेणार आहे. तसेच महसूल विभागाच्या नवीन योजना आणणार असून त्या संदर्भात प्राथमिक चर्चा अधिकाऱ्यांशी करणार आहे.
जनावरांच्या त्वचा आजारांचा मोठ्या प्रमाणात पसार झाला होता. पण राज्य सरकारने त्यावर नियंत्रण मिळवले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बाधित होण्याचे प्रमाण हे अत्यंत कमी झाले आहे. अमरावती विभागात त्याचा प्रादुर्भाव मोठा झाला होता. त्याचाही आढावा बैठकीदरम्यान घेणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालय परिसरात अखेर प्रभातफेरी बंद; उच्च न्यायालयाचा निर्णय

संबंधित बातम्या

“महाराष्ट्राचे देव संपले का?” शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी…”
मॉडेलिंग सोडून देहव्यापाराकडे वळली अन्…; खबऱ्याच्या एका ‘टीप’ने बिघडवला खेळ
लोकसभेसाठी भाजपचे ‘मिशन ४५’; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बुलढाण्यात
अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ देशातील पहिला सेंद्रिय प्रमाणीकरण अभ्यासक्रम राबविणार
नागपूर : रूग्णाच्या मृत्यूमुळे किमया रुग्णालयात तोडफोड, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

व्हिडिओ

ताज्या बातम्या
VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप
Video : भिंतीचा आधार घेत पार्टीतून बाहेर पडली सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी; नेटकरी म्हणाले, “धड चालताही…”
पैशांचा अपहार झालाय? चिंता करू नका, Cyber Fraud झाल्यावर या नंबरवर कॉल करा अन् पैसै वाचवा
“…तेव्हा तेव्हा विक्रमकाका तुमची उणीव भासत राहील” अमोल कोल्हे हळहळले
‘Squid Game’ या लोकप्रिय वेबसीरिजमधील अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; पाच वर्षांपूर्वी घडलेला प्रकार आला समोर