नागपूर : अलीकडील काळात राधानगरी वन्यजीव अभयारण्यात दोन नर वाघांच्या अस्तित्वाची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे सह्याद्री परिसरात आता वाघांची संख्या वाढत असल्याचे निश्चित झाले आहे.
वाघीण नाही, तर दोन्हीही वाघ
अलीकडील काळात राधानगरी वन्यजीव अभयारण्यमध्ये दोन नर वाघांच्या अस्तित्वाबाबत माहिती समोर आली असून त्यासंबंधी वन विभागाकडून सखोल पडताळणी करण्यात आली आहे. नियमित गस्तीदरम्यान तसेच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या पुराव्यांवरून STR-07 आणि STR-08 असे नामांकन असलेले दोन्ही वाघ नर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाघांच्या हालचालींवर लक्ष
वनविभागाकडून या दोन्ही वाघांच्या हालचालींवर सतत निरीक्षण ठेवण्यात येत असून त्यांच्या क्षेत्रांचा (territory) अभ्यास सुरू आहे. त्या वाघांचा अधिवास नेमका कोणता, हे पाहिले जात आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार दोन्ही वाघ प्रौढ अवस्थेतील असून त्यांच्या हालचाली स्वतंत्र क्षेत्रांमध्ये होत असल्याचे दिसून येते.
वाघांची ओळख निश्चित
वनकर्मचाऱ्यांकडून गस्तीदरम्यान मिळालेल्या पगमार्क्स, कॅमेरा ट्रॅप छायाचित्रे तसेच इतर वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे या वाघांची ओळख निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या हालचालींचे मार्ग, पाणवठ्यांचा वापर आणि निवासक्षेत्र यांचे सखोल विश्लेषण सुरू आहे. मध्ये दोन नर वाघांच्या अस्तित्वाबाबत माहिती समोर आली असून त्यासंबंधी वन विभागाकडून सखोल पडताळणी करण्यात आली आहे. नियमित गस्तीदरम्यान तसेच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या पुराव्यांवरून STR-07 आणि STR-08 असे नामांकन असलेले दोन्ही वाघ नर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वतंत्र क्षेत्रात हालचाली
वनविभागाकडून या दोन्ही वाघांच्या हालचालींवर सतत निरीक्षण ठेवण्यात येत असून त्यांच्या क्षेत्रांचा (territory) अभ्यास सुरू आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार दोन्ही वाघ प्रौढ अवस्थेतील असून त्यांच्या हालचाली स्वतंत्र क्षेत्रांमध्ये होत असल्याचे दिसून येते. वनकर्मचाऱ्यांकडून गस्तीदरम्यान मिळालेल्या पगमार्क्स, कॅमेरा ट्रॅप छायाचित्रे तसेच इतर वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे या वाघांची ओळख निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या हालचालींचे मार्ग, पाणवठ्यांचा वापर आणि निवासक्षेत्र यांचे सखोल विश्लेषण सुरू आहे.
सावंतवाडी दोडामार्ग ते राधानगरी अभयारण्य हा भाग वाघांच्या अतिशय चांगला भ्रमण मार्ग आहे. पुढे हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यंत आहे. त्यामुळे वाघ हा उत्तरेकडे पुढे स्थलांतर होण्यास मदत होत आहे, असे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे म्हणाले. सह्याद्री पर्वतरांगत वाघांची वाढती संख्या हे व्याघ्र प्रकल्प संवर्धनाचे यश आहे. रायबा – सरदार मुळे (T7 -T8) सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्वाचा दुवा असल्याचे अधोरेखीत होते, असे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण म्हणाले.
नऊ वाघांचेअस्तित्व
सह्याद्री व्याघ्रप्रकल्प व त्याला जोडणाऱ्या राधानगरी अभ्यारण्यात आता T1 सेनापती, T2 सुभेदार, T3 बाजी, T4 चंदा, T5 तारा, T6 हिरकणी, T7 रायबा, T8 सरदार, T9 शिलेदार अशा नऊ वाघांचे अस्तित्व आहे.
