scorecardresearch

INDIAN RAILWAY रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या: आता भुसावळ, चंद्रपूर, सिंदी, बडनेरात थांबणार ‘या’ एक्स्प्रेस; तिकीट खपाच्या आढाव्यानंतर…

INDIAN RAILWAY रेल्वे मंडळाने काही थांबे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सहा महिने काही गाड्यांचे थांबे राहतील

what is difference between i ticket and e ticket in indian railways
भारतीय रेल्वेच्या I-ticket आणि E-ticket मध्ये फरक काय (संग्रहित फोटो)

INDIAN RAILWAY UPDATED वर्धा: रेल्वे मंडळाने काही थांबे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सहा महिने काही गाड्यांचे थांबे राहतील. पुढे तिकीट विक्रीचा आढावा घेवून थांबे कायम करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

३० मार्चपासून मदुराई-चंदीगड एक्स्प्रेसचा चंद्रपूर, १ एप्रिलपासून हैदराबाद-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस भांदकला, ३१ मार्चपासून अमरावती-नागपूर एक्स्प्रेस सिंदी, एक एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर एक्स्प्रेस बडनेरा येथे तर चार एप्रिलपासून हजुर साहिब नांदेड ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा भुसावळ येथे थांबा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. तिकीट विक्रीचा आढावा रेल्वे मंडळास पाच महिन्यात सादर करायचा आहे. सध्या या गाड्या धावत आहेच. केवळ थांब्याबाबत निर्णय झालेला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 16:27 IST

संबंधित बातम्या