बुलढाणा : उद्या गुरुवारपासून होणाऱ्या गणेश विसर्जनावर पावसाचे सावट आहे. यामुळे गणेश मंडळांसह पोलीस दादांची गैरसोय व लाखो गणेश भक्तांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात २६,२७ व २९ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी, २८ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी तर ३० सप्टेंबरला बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान उद्या गुरुवारी २८ सप्टेंबरला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. घरोघरी स्थापना करण्यात आलेल्या गणरायांचे विसर्जन करण्यात येणार आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक सहपरिवार जातात. तसेच पहिल्या दिवशी बहुतांश मंडळे विसर्जन करतात. त्यांच्यासह बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. हेही वाचा - “दिव्यांगांसाठीच्या उपक्रमात येण्यास नेते अनुत्सुक”, बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत, म्हणाले… हेही वाचा - एसटी बँकेला रिझर्व बँकेचा दणका; निर्णयांना स्थगिती देत दोन लाखांचा दंड लम्पी टाळण्यासाठी 'हे' करा दरम्यान पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या बुलढाणा विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून, जनावरांचा गोठा निर्जंतुक करून घ्यावा. गोठा स्वच्छ व कोरडा राहील याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे. मुग, उडीद पिकांची कापणी झाली असल्यास शेत रब्बी पिकांसाठी तयार करताना काळजी घ्यावी. जमिनीतील ओलावा टिकून राहील या पद्धतीने मशागत करावी. पाऊसमान लक्षात घेऊनच करडई, रब्बी ज्वारीची पेरणी करावी, असे केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.