नागपूर : रायपूरमध्ये मंगळवारी हवामानाने अचानक रौद्र रूप धारण केल्याने विमान वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. मुसळधार पाऊस आणि दाट ढगांमुळे निर्माण झालेल्या कमी दृश्यमानतामुळे इंडिगोची दोन विमाने तातडीने नागपूर विमानतळाकडे वळवण्यात आली आहेत.
कोलकाता-रायपूर झेपावलेले हे विमान रायपूरला उतरू शकले नाही. अखेर रात्री वाजता नागपुरात त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. रायपूर-अहमदाबादहून उड्डाण घेतलेले हे विमानही खराब हवामानामुळे नागपूरकडे वळवण्यात आले आणि रात्री ८:०९ वाजता सुरक्षितपणे नागपूर विमानतळावर उतरले.
दोन्ही विमानांमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून सध्या त्यांना नागपूर विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये ठेवण्यात आले आहे. रायपूरमधील हवामान जोपर्यंत पूर्ववत होत नाही, तोपर्यंत या विमानांच्या उड्डाणाबाबत अनिश्चितता कायम आहे.
रायपुरात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत असून अचानक झालेल्या या बदलामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
