नागपूर : शाळा आणि महाविद्यालयात असताना विद्यार्थ्यांमध्ये होणारी हाणामारी काही नवीन विषय नाही. अनेकदा दोन विद्यार्थी किंवा समूहामध्ये मोठे मोठे भांडण झालेली आपण पाहिलेली आहेत. पण एका वर्गातील दोन विद्यार्थिनींमध्ये भांडणे होण्याचे प्रकार काहीसा नवीन आहे.
नागपूरच्या रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये असाच एक प्रकार समोर आलेला आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहता या दोन्ही विद्यार्थिनी एकमेकांना तुफान मारहाण करताना दिसत आहेत.
रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील प्रतिष्ठित महाविद्यालय आहे. मात्र या महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींचा व्हिडिओ पाहिला असता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो आहे. या दोन विद्यार्थिनींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या दोन्ही विद्यार्थिनी एकमेकांना फ्री स्टाईल मध्ये मारहाण करताना दिसत आहेत. त्यांच्या मैत्रिणी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र कुणालाही नजुमानता या दोघे एकमेकांना प्रचंड मारहाण करत आहेत.
