नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तसेच इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयात एका वकीलाने मारहाण केली. त्यापूर्वी त्यांच्या कोल्हपूरी चप्पल भिरकवण्यात आली होती. यावरून कोरटकर यांच्याविरुद्ध समाजात रोष असल्याचे दिसून येत आहे.
शिवभक्त गनिमी काव्यासाठी तयार
शिवशक्तांना राज्यात शांतता हवी आहे. परंतु ते महापुरुषांचा अपमान कदापि सहन करणार नाहीत. कोरटकरने वापरलेली भाषा द्वेषपूर्ण आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये संताप आहे. ते गनिमी काव्यासाठी तयार आहेत. आता अधिक काळ थांबू शकत नाही. लोक काय करतील हे सांगता येत नाही. कोरटरकरला सुरक्षित ठेवायचे असेल तर सरकारने त्याला अटक करून आत ठेवावे, असा सूचक इशाराही भोसले यांनी दिला.
महाराष्ट्र पोलिसांना कोरटकरला अटक करण्यात बरीच दिरंगाई केली. त्यानंतर महिनाभरानंतर काँग्रेसचे सरकार असलेल्या तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली आहे. कोरटकरवर प्रभावशाली नेत्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करताना राजे मुधोजी भोसले यांनी व्यक्त केला होता. तसेच शिवभक्त प्रचंड संतापले असून ते गनिमी काव्यासाठी तयार असल्याचा इशारा दिला. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. कोरटकर यांच्यावर एका वकिलाने हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे.
राजे मुधोजी भोसले यांनी लोकसत्ता कार्यालयाला दिलेलऱ्या सदिच्छा भेटीत हा इशारा दिला होता. ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून काही समाजकंटकांकडून वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. चित्रपट उत्कृष्ट आहे. हिंदी चित्रपट असल्याने संपूर्ण देशाला छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य कळले. परंतु, काही असामाजिक तत्वांना त्याबद्दल असूया वाटत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वाईट बोलून आणि त्यांना कमी लेखून या लोकांनी आपल्या मनातील द्वेष ओकला आहे. एक विशिष्ट समाज कायम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा विरोध करीत आहे. ३०० ते ३५० वर्षांपासून हे असेच सुरू आहे.
इतिहासाकडे इतिहास म्हणूनच बघितले तर असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. ज्यांना महापुरुषांबद्दल चांगले बोलणे शक्य होत नाही त्यांनी किमान त्यांच्याबद्दल वाईटही बोलू नये. कोरटकरने जे बोलला त्यातून त्याला एका विशिष्ट समाजात ‘हिरो’ बनायचे होते. पण, त्या समाजालाही अशा प्रकारचे बोलणे मान्य असेलच असे नाही. एक मात्र खरे की, सामाजात तेढ निर्माण करण्याचा हेतू यातून स्पष्टपणे दिसून येतो. काही लोक अशाप्रकारचे मुद्दे उपस्थित करून मराठा समाजाच्या आरक्षणाला बगल देण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, अशी शंकाही भोसले यांनी उपस्थित केली.