scorecardresearch

VIDEO : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा, रोषणाईने उजळली जिजाऊ सृष्टी!

राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरी नटली असून देश विदेशातून येणाऱ्या जिजाऊ भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

VIDEO : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा, रोषणाईने उजळली जिजाऊ सृष्टी!
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बुलढाणा: राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरी नटली असून देश विदेशातून येणाऱ्या जिजाऊ भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. दूरवरचे जिजाऊ भक्त रात्रीच नगरीत दाखल झाले असून जिल्ह्यसह सीमावर्ती जिल्ह्यातील प्रेमींनी आज गुरूवारी ( दि. १२) पहाटे सिंदखेड राजाकडे कूच केली.

VIDEO >>

 मुख्य सोहळा दुपारी २ वाजता सुरू होणार असून यासाठी जिजाऊ सृष्टी सज्ज झाली आहे.  रोषणाईने रात्रीच्या वेळी सृष्टीचे सौन्दर्य दृष्टीचे पारणे फेडणारे ठरत आहे. याठिकाणी आयोजित मुख्य सोहळ्याच्या समारोपात   मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर व खासदार उदयनराजे भोसले हे मुख्य मार्गदर्शन करणार आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 09:41 IST

संबंधित बातम्या