अमरावती : वरूड तालुक्यातील राजुरा येथील मिरची बाजारात लगबग वाढली आहे. विदर्भात रात्रीतून चालणारी ही एकमेव बाजारपेठ असून सायंकाळी ७ वाजेपासून सुरू होणारा बाजार मध्यरात्रीनंतरही सुरू असतो. एका रात्रीत या बाजारपेठेत हिरव्या मिरचीची कोट्यवधींची उलाढाल होते.येथील हिरव्या मिरचीला परदेशातूनही मागणी असल्याने या बाजाराची ख्याती वाढली आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या हिरव्या मिरचीची ओळख घाटावरची तिखट मिरची अशी आहे. ही मिरची अतिशय तिखट असल्याने तिला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मिरची खरेदीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी येथे डेरेदाखल होतात.रविवारी सुमारे ३०० क्विंटल मिरचीची आवक झाली आणि ३ हजार ५०० ते ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आवक वाढताच दर थोडे कमी झाले आहेत. १० सप्टेंबर रोजी १९९ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली होती आणि ४ हजार रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा