लोकसत्ता टीम

बुलढाणा: आमचे नेते सध्या राज्यसभा सदस्य असले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. येत्या २८ मे रोजी शिर्डी येथे आयोजित पक्षाच्या अधिवेशनात ते याची घोषणा करणार आहेत, अशी महत्वपूर्ण माहिती रिपाइं (आठवले) पक्षाचे राज्य संघटक तथा जिल्हा पक्ष निरीक्षक अशोक नागदिवे यांनी येथे दिली.

Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Rahul gandhi
“सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा
raju shetty uddhav thackeray (1)
“…म्हणून मी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नाही”, राजू शेट्टींनी स्पष्ट केली भूमिका
Environment
निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पर्यावरणाचा समावेश करावा, पर्यावरणप्रेमींचे निवडणूक आयोगाला पत्र

बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात आज दुपारी आयोजित पत्र परिषदेत नागदिवे म्हणाले, आठवले शिर्डी मधून निश्चितच निवडून येतील. मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून रिपाइंला सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचे सांगून महाराष्ट्रात रिपाइंच्या कोणत्याच नेत्यांना भाजप विश्वासात घेत नाही. त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रिपाइंच्या नेत्यांना बोलवले जात नाही.

हेही वाचा… रावत यांच्यावर गोळीबार करणाऱ्याला तात्काळ अटक करून अहवाल सादर करा; पालकमंत्री मुनगंटीवार यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र

आम्ही राष्ट्रीय नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे आमची व्यथा मांडली आहे. ही उपेक्षा कायम राहिली तर येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही अशोक नागदिवे यांनी दिला. आम्ही स्वबळावर सत्ता आणू शकत नाही अशी कबुली देतानाच मित्रपक्षाला आमचे उपद्रवमूल्य नक्कीच दाखवून देऊ, असा दमही नागदिवे यांनी भरला.